36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeमहाराष्ट्रमास्क मिळणार अवघ्या तीन ते चार रूपयांत !

मास्क मिळणार अवघ्या तीन ते चार रूपयांत !

एकमत ऑनलाईन

मुुंबई, दि. ८ (प्रतिनिधी) मास्क आणि सॅनिटायझरची भरमसाठ दराने विक्री करून सर्वसामान्यांची लूट करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध राज्य सरकारने कारवाईचा बडगा उचलल्याने आता याच्या किमती कमी झाल्या आहेत. आता सामान्यांना परवडणाऱ्या व किफायतशीर किमतीत मास्क उपलब्ध होणार असून एन-९५ मास्क त्याच्या प्रकारानुसार साधारण १९ ते ५० रुपयांपर्यंत, तर दुहेरी आणि तिहेरी पदरांचे मास्क अवघ्या तीन ते चार रुपयांना उपलब्ध होतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

कोरोना काळात राज्य सरकारच्यावतीने सामान्य नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्क वापरणे आणि सॅनिटायझरने हात धुवावेत, असे वारंवार आवाहन केले जात आहे. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझरला मोठी मागणी असून त्याचे दर नियंत्रित असावेत यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण आणण्याकरिता राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने आज राज्य शासनाला अहवाल सादर केला. त्यानुसार आता सामान्यांना परवडणाNया अशा किफायतशीर किमतीत मास्क उपलब्ध होणार आहे.

कोरोना साथीच्या आधी एन-९५ मास्क ४० रुपयांना विकला जायचा. मार्चमध्ये हाच मास्क ४० वरून १७५ रुपये एवढ्या चढ्या दराने विकला गेला. म्हणजे त्यांच्या दरात ४३७.५ टक्के एवढी वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. काही एन-९५ मास्क तर २५० रुपयांपर्यंत विक्री झाले आहेत. तिहेरी आणि दुहेरी पदर असलेले मास्क ८ ते १० रुपयांवरून १६ रुपयांना विक्री झाले असून त्यांच्या किंमती १६० टक्के पेक्षा जास्त वाढ झाल्याचे समितीच्या निदर्शनास आले आहे, असे टोपे यांनी सांगितले.

समितीने कच्चा माल, उत्पादन किंमत, उत्पादक, वितरक यांचा नफा यासर्व बाबींचा अभ्यास करुन समितीने किंमत निश्चित केल्या आहेत. मास्क किफायतशीर किमतीत उपलब्ध झाल्यावर सामान्यांना दिलासा मिळणार असून योग्य निकषानुसार त्याचे उत्पादन देखील होईल आणि योग्य दरात त्याचा पुरवठाही होईल. रुग्णालयांच्या रुग्णसेवा खर्च देखील त्यामुळे कमी होईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

मराठा आरक्षण आंदोलनाची एकसूत्री भूमिका १७ ऑक्टोबरला पुण्यातून ठरवली जाईल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या