34.3 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeमहाराष्ट्रभारतातील टॉप पाच भिका-यांची संपत्ती ऐकून व्हाल थक्क

भारतातील टॉप पाच भिका-यांची संपत्ती ऐकून व्हाल थक्क

एकमत ऑनलाईन

मुंबई : जगातला प्रत्येक व्यक्ती आपले घर चालवण्यासाठी आणि कुटुंबासाठी काम करत असतो. एखाद्या व्यक्तीची कमाई किती असेल याचा अंदाज साधारणता आपण त्याच्या लाईफस्टाईलवरुन ठरवतो. मात्र, काही लोकांची जीवनशैली पाहून तुम्ही चुकूनही अंदाज लावू शकणार नाही, की ते भिकारी आहेत किंवा भीक मागून उपजीविका करतात. काही भिकारी तर असेही आहेत, ज्यांची कमाई आणि संपत्ती ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. तर, वाचा भारतातील अशा ५ भिका-यांबद्दल ज्यांच्याकडे अपार्टमेंट, भरपूर बँक बॅलन्स आहे. मात्र, तरीही ते रस्त्यावर भीक मागतात.

देशातील सर्वात श्रीमंत ५ भिका-यांच्या यादीत पहिले नाव येते मुंबईच्या परेळमधील भरज जैन यांचे. त्यांच्याकडे मुंबईमध्ये दोन फ्लॅट आहेत. याची किंमत तब्बल १४० लाख इतकी आहे. याशिवाय भीक मागून प्रत्येक महिन्याला ते जवळपास ७५ हजार रुपये कमवतात. या यादीत दुसरे नाव आहे़ कोलकातामधील लक्ष्मी. लक्ष्मीने वयाच्या सोळाव्य वर्षीच भिक मागण्यास सुरुवात केली होती. १९६४ पासून आतापर्यंत भीक मागून त्यांनी लाखो रुपयांची संपत्ती जमवली आहे. सध्याच्या काळात लक्ष्मी भीक मागून दररोज १ हजार रुपये कमावते. या यादीत तिस-या क्रमांकावर मुंबईमधील गीता आहे. रिपोर्टनुसार, मुंबईच्या चरनी रोडजवळ भीक मागणा-या गिताने एक फ्लॅट विकत घेतला आहे. दररोज भीक मागून ती तब्बल १५०० रुपये कमावते. यानुसार तिची महिन्याची कमाई ४५ हजार इतकी आहे.

चौथ्या नंबरवर नाव आहे़ चंद्र आजाद यांचे. २०१९ मध्ये एका रेल्वे दुर्घटनेत चंद्र आजाद यांचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांना तपासादरम्यान त्यांच्या संपत्तीबद्दल माहिती मिळाली. यात त्यांच्या बँक खात्यात ८.५० लाख रुपये असून १.५ रोख असल्याचेही समोर आले होते. बिहारच्या पटना येथील प्लॅटफॉर्मवर भीक मागणारे पप्पू श्रीमंत भिका-यांच्या लिस्टमध्ये पाचव्या स्थानी आहेत. एका दुर्घटनेत पप्पू यांना आपला पाय गमवावा लागला होता. यानंतर त्यांनी रेल्वे स्टेशनवर भीक मागण्यास सुरुवात केली. पप्पूकडे जवळपास १.२५ कोटीची संपत्ती आहे.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या