शिरूर : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावठाणातील काळे आळीत राहणा-या एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. मुक्ता बहादुर कामी (३५) असे त्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी कृष्णा सुरत खतीवाडा यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून मुक्ताने पत्नी व मेहुण्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुक्ता बहादुर कामी याने फिर्यादी कृष्णा यांना फोन करुन सांगितले होते की, त्याला त्याची पत्नी कल्पना व मेहुना लोकबहादूर बिका हे दोघे त्रास देत आहेत. या त्रासाला कंटाळूनच मुक्ता बहादुर कामी याने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी शिरूरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले व पोलीस पुढील तपास करीत आहेत.