26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रनुपूर शर्माचा डीपी ठेवल्याने तरुणावर प्राणघातक हल्ला; नितेश राणेंचा आरोप

नुपूर शर्माचा डीपी ठेवल्याने तरुणावर प्राणघातक हल्ला; नितेश राणेंचा आरोप

एकमत ऑनलाईन

मुंबई : अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्या प्रकरणाप्रमाणे कर्जतमध्ये एका तरुणाची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत प्रकरणाचा छडा लावत आरोपींना शिक्षा देण्यात येईल असे म्हटले आहे. यावेळी नितेश राणे यांनी सांगितले की, नुपूर शर्माचा डीपी ठेवला म्हणून कर्जतमधील प्रतीक पवार या तरुणाला चार ऑगस्ट रोजी मारहाण करण्यात आली.

प्रतीकवर सध्या उपचार सुरू असून त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. उदयपूर आणि अमरावतीतील हत्येच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये हत्येचा प्रयत्न करणा-याला कठोर शिक्षा होईल. भाजपाने कधीही नुपूर शर्माचे समर्थन केले नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘उपमुख्यमंत्री प्रकरणावर लक्ष ठेवून’
यावेळी नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत म्हटले आहे की, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर देश चालतो. हे महाविकास आघाडीचे सरकार नाही. संबंधित व्यक्तीवर कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. तेथील स्थानिक पोलिस आधिकारी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत होते.

देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. मात्र काही जण अजूनही फरार आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे. संबंधित व्यक्तीवर कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही. उपमुख्यमंत्री प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. आरोपींना कठोर शिक्षा होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या