33.7 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeमहाराष्ट्रधारावीत पहिल्यांदाच शून्य रुग्णसंख्येची नोंद

धारावीत पहिल्यांदाच शून्य रुग्णसंख्येची नोंद

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकेकाळी कोरोना व्हायरसचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतून दिलासादायक बातमी समोर आली आहे. पहिल्यांदाच धारावीत शून्य रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. कोविड-१९ संसर्गाच्या दुसºया लाटेत धारावीत पहिल्यांदा शून्य रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत तेथे एकही रुग्ण सापडला नाही.
धारावीत दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या प्रथमच शून्यावर आली आहे.

उत्तर वॉर्डमधील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी मुंबई पालिकेने जाहीर केली. या आकडेवारीनुसार, या वॉर्डमध्ये केवळ नऊ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत पहिल्यांदा एकही रुग्ण आढळून आला नाही. याआधी एक दिवस हा आकडा दोन वर होता.

सध्या ६ हजार ८६१ रुग्ण
सध्या धारावीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६ हजार ८६१ इतकी आहे. दादरमध्ये ३ तर माहिममध्ये ६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दादरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या ९ हजार ५५७ इतकी आहे. माहिममध्ये कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ९ हजार ८७६ वर पोहोचला आहे.जी/ उत्तर वॉर्डमध्ये एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २६ हजार २९४ इतका झाला आहे.

स्पुटनिक व्ही बाजारात दाखल

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या