नवी दिल्ली : राज्यामध्ये होत असलेल्या पेपरफुटी प्रकरणाबाबत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिल्लीमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, राज्यात पेपर फुटले हे मुख्यमंत्री मान्य करणार नाहीत. कारण पेपरफुटीतले लाभार्थी हे सर्व त्यांच्याच पक्षातले आहेत. नीटचे पेपर फोडणारे जेलमध्ये असले तरी ते त्याच नेटवर्कमध्ये काम करताहेत. लाभार्थी ही तेच आहेत आणि पेपर फोडणारे तेच आहेत. मुख्यमंर्त्यांनी केव्हातरी मान्य करावे की पेपर फुटले आहेत असे म्हणत संजय राऊत यांनी राज्य सरकारला खडे बोल सुनावले.
महाराष्ट्र हे कधीकाळी शिक्षणाच्य्या बाततीत प्रतिष्ठीत राज्य होते. आज महाराष्ट्राचे नाव सर्वात खाली गेलंय याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत, असे म्हणत संजय राऊत यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं. जंतरमंतरच्या मुलांनी मोदींच्या भाषणावर जी हास्यजत्रा सुरू केली. त्यावर आमचे मुख्यमंत्री म्हणतात मोदीजींचा व्हीडीओ इतक्या लाखो लोकांनी पाहिला. राज्यातील मुख्यमंत्र्यांनी जंतरमंतरवरील डिजीटल मास्टर मुले आहेत. त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतले पाहिजे. आयटी सेलकडून शिकून चालणार नाही. आयटी सेल आता पुरातन काळात गेले. आता खरी डिजिटल इंडिया ही देशाने पाहिली ती जंतर मंतरवरून पाहिली. आयटी सेलला टाळे लावावे लागले.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी निवेदन द्यावे
जंतरमंतरवर चाललेल्या विद्यार्थी आंदोलनामध्ये लाठीचार्जची जबाबदारी कोण घेणार असे म्हणत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्रसरकारला धारेवर धरले. दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, लाठीचार्ज करण्याची जबाबदारी कोण घेणार हा आदेश कोणी दिला? यासंदर्भात या देशाच्या गृहमंर्त्यांनी संसदेमध्ये येऊन निवेदन करावं. बाकी सगळ्या गोष्टीवर निवेदनं करतात. ३७० कलमाची जबाबदारी घेतात. आता वंदे मातरमची जबाबदारी घेणारेत. पक्ष फोडण्याची जबाबदारी घेतात. मग या दिल्लीमध्ये जंतरमंतरवर केलेल्या लाठीचार्जची जबाबदारी कुणी घ्यावी यासंदर्भात गृहमंत्र्यांचे निवेदन घ्यायला पाहिजे. झाल्या प्रकाराबद्दल प्रधानमंर्त्यांनी देशाची माफी मागायला पाहिजे. या फार सोप्या मागण्या आहेत अहंकार कसला आहे. तुम्हाला असे म्हणत संजय राऊतांनी केंद्रसरकारवर शरसंधान साधले.
















