26.2 C
Latur
Saturday, September 14, 2024
Homeक्रीडामहाराष्ट्राचा सुपुत्र अविनाश साबळे फायनलमध्ये

महाराष्ट्राचा सुपुत्र अविनाश साबळे फायनलमध्ये

पॅरिस : लक्ष्य सेन आणि निशा दहिया यांना पदकाने थोडक्यात हुलकावणी दिल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीयांचा आजचा दिवस निराशाजनक राहिला होता. त्यामुळे मैदानी स्पर्धेत सर्वांच्या नजरा महाराष्ट्राच्या अविनाश साबळे याच्याकडे लागल्या होत्या. पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात तगड्या स्पर्धकांना त्याने टक्कर दिली आणि फायनलमध्ये आपली जागा पक्की केली.

हीट २ मध्ये अविनाश पळाला आणि त्याच्या गटात केनियाचा अब्राहम किविबोट, इथोपियाचा सॅम्युअल फिरेवू व जपानचा रियूजी मियूरा या जागतिक क्रमवारीत अव्वल १० मध्ये असलेल्या खेळाडूंचे आव्हान होते. अविनाश जागतिक क्रमवारीत १५ व्या क्रमांकावर आहे आणि ८ मिनिटे ९.९१ सेकंद ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक वेळ आहे. आता हीट ३ मधून प्रत्येकी ५ असे १५ खेळाडू फायनलसाठी पात्र ठरणार होते.

अविनाशने सुरुवातीपासून आघाडी घेतली होती आणि अब्राहम व सॅम्युअल त्याच्या मागोमाग होते. पण, १००० मीटर नंतर अविनाश तिस-या क्रमांकावर ढकलला गेला. जपानच्या खेळाडूने अविनाशला आणखी एक स्थान मागे ढकलले. २००० मीटर अंतर संपेपर्यंत अविनाशने पुन्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आणि दुस-या स्थानावर येऊन पोहोचला. अब्राहम वारंवार मागे वळून जवळ येणा-या अविनाशकडे पाहत होता. मात्र, शेवटच्या लॅपची घंटा वाजली आणि अविनाश मागे पडला. पण, अविनाशने पाचव्या स्थानासह फायनलमधील आपली जागा पक्की केली. अविनाश ८ मिनिटे १५.४३ सेकंदासह फायनलमध्ये पोहोचला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR