17.9 C
Latur
Friday, December 13, 2024
Homeमहाराष्ट्रमहाविकास आघाडीला मिळणार स्पष्ट बहुमत!

महाविकास आघाडीला मिळणार स्पष्ट बहुमत!

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून, मतदानाला अवघे ५ दिवस शिल्लक असताना लोकपोलने केलेल्या सर्वेक्षणाचे अंदाज समोर आले आहेत. महाविकास आघाडीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज लोकपोलने वर्तवला आहे. महाविकास आघाडीला १५१ ते १६२ जागा मिळतील तर महायुतीला ११५ ते १२८ जागांवर यश मिळेल, असे लोकपोलचा सर्व्हे सांगतो. त्यामुळे राज्यात सत्तांतर होण्याची दाट शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला झालेल्या मतदानात फारसा फरक नव्हता. पण विधानसभेला चित्र वेगळे दिसेल, असा अंदाज आहे. महायुतीला ३७ ते ४० टक्के मतदान होण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीला ४३ ते ४६ टक्के मते मिळू शकतात तर अन्य पक्षांना १६ ते १९ टक्क्यांसह ५ ते १४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला केवळ १७ जागांवर यश मिळाले होते तर मविआने ३० जागा खिशात घातल्या होत्या.

विधानसभा मतदारसंघनिहाय परिस्थिती पाहिल्यास लोकसभेला मविआने १५३ जागांवर आघाडी घेतली होती, तर महायुती १२७ जागांवर पुढे होती. आता विधानसभेलाही तसाच निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. लोकपोलच्या सर्व्हेनुसार मविआला १५१ ते १६२ आणि महायुतीला ११५ ते १२८ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

महायुतीत अजित पवारांना फटका?
महायुतीत सर्वाधिक फटका अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि मविआला सर्वाधिक नुकसान ठाकरेंच्या शिवसेनेचे होऊ शकते, असे लोकपोलचे सर्वेक्षण सांगते. याचा अर्थ लोकसभा निकालाचीच पुनरावृत्ती विधानसभेलाही होईल, अशी दाट शक्यता आहे. प्रत्येक मतदारसंघातील जवळपास ३०० जणांनी बोलून लोकपोलने सर्व्हे केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR