सोलापूर : इलेक्ट्रिक पोलवर चढून काम करीत असताना अचानक विद्युत पुरवठा सुरू झाला आणि त्यात धनंजयच्या मृत्युप्रकरणी महावितरणचा विद्युत तंत्रज्ञ प्रवीण औदुंबर टोणपे (रा. शिराळ, ता. माढा) याची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
१७ सप्टेंबर २०१६ रोजी आरोपीनं कार्यालयास विद्युत पुरवठा बंद करण्यास सांगितले. त्यानंतर धनंजय हा पोलवर चढून काम करीत असतानाच अचानक विद्युत पुरवठा सुरू झाला आणि त्याला विजेचा धक्का बसला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात नेले असता तेथे तो मरण पावला. आरोपीने वीजपुरवठा बंद झाल्याची खात्री केली की नाही. खात्री न करताच त्याने भाऊ धनंजयला पोलवर चढण्यास सांगितले. त्याच्या निष्काळजीपणामुळेच धनंजयचा मृत्यू झाल्याची फिर्याद पोलिसांमध्ये दिली. आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खटल्यात सहायक अभियंता नागणे यांची अॅड. अभिजीत इटकर यांनी उलटतपासणी घेतली. अनेक महत्त्वाच्या उलटतपासणीत युक्तिवादात विसंगती त्यांनी बाबी त्यांनी कबूल केल्या. साक्षीदारांमधील न्यायालयाच्या निदर्शनास आणून देताना उच्च न्यायालयातील काही निवाडे सादर केले. आरोपीच्या वकिलांचा हा युक्तिवाद न्यायालयाने ग्रा धरला. ही उलटतपासणी खटल्यास कलाटणी देणारी ठरली. आरोपीतर्फे अॅड. अभिजित इटकर, अॅड. राम शिंदे, अॅड. संतोष आवळे, अॅड. फैय्याज शेख, अॅड. सुमित लवटे, अॅड. शिवाजी कांबळे यांनी काम
पाहिले.