शिवमोगा : ‘कांतारा चॅप्टर १’ या चित्रपटाचे शूटींग कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यात सुरु असून. मस्ती कट्टे भागात असलेल्या मणी जलाशयात बोअ उलटून ३० क्रु मेम्बर्स बुडाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली आहे.
कांतारा चित्रपटाला मोठे यश मिळाल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक ऋषभ शेट्टी हे दुसरा भाग बनवत आहेत. मात्र मे महिन्यापासून शूटिंगदरम्यान अनेक अनुचित घटना घडत आहेत. आता बोट उलटून झालेल्या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही, मात्र या घटनेत अनेक महागडे कॅमेरे आणि इतर उपकरणे पाण्यात बुडाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा चॅप्टर १’ या चित्रपटाच्या शूटिंगला ग्रहन लागल्याचे दिसत आहे. कारण या चित्रपटाच्या निर्मात्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दुर्दैवी घटना घडत आहेत. अभिनेता कलाभवन निजूचा शूटिंगदरम्यान मृत्यू झाला होता, त्यानंतर आता चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक बोट उलटली ज्यामध्ये ३० क्रू मेंबर्स होते अशी माहिती समोर आली आहे.
शूटिंगपूर्वी देवाची पूजा
रामदास पुजारी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, ‘दक्षिण कन्नडमधील आत्म्यांवर चित्रपट बनवणे हे धोकादायक आहे. परंतु ऋषभ शेट्टीने या चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी देवाची पूजा देखील केली होती आणि त्याने या चित्रपटाच्या शूटिंगसाठी परवानगी देखील घेतली होती.