‘जेलर २’च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा शॉक लागून क्रू मेंबरचा जागीच मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी
चेन्नईतील एका खासगी स्टुडिओमध्ये ‘जेलर २’चे शूटिंग सुरू होते. यावेळी आर्ट डिपार्टमेंटमध्ये काम करणारे कार्तिकेयन नावाचे कर्मचारी घरासारखा सेट तयार करण्याचे काम करत होते. सेट उभारणीदरम्यान अचानक विजेचा प्रवाह सुरू झाल्याने त्यांना जोरदार करंट बसला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या सहका-यांनी त्यांना तातडीने वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

स्थानिक कनाथुर पोलिसांनी या घटनेची प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सेटवर नेमकी वीज लीक कशी झाली आणि सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये काही हलगर्जीपणा झाला होता का, याचा तपास केला जात आहे.

दरम्यान, चित्रपटाच्या टीमकडून किंवा निर्मात्यांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित हा चित्रपट ‘जेलर’ या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल आहे. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जेलर’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवत जगभरात ६०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती.

‘जेलर २’मध्ये रजनीकांत पुन्हा एकदा ‘टायगर’ मुथुवेल पांडियन या दमदार भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेत्री राम्या कृष्णन त्यांच्या पत्नी विजया यांच्या भूमिकेत पुनरागमन करणार आहेत. तसेच शिव राजकुमार आणि मोहनलाल यांचे विशेष कॅमिओदेखील चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. याशिवाय मिथुन चक्रवर्ती हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. अद्याप ‘जेलर २’च्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded Accident|ट्रक-टँकरच्या अपघातात एक जण जागीच ठार
00:32
Video thumbnail
Nanded Murder|सोनखेड पेट्रोल पंपावर प्लंबरचा खून;मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद
00:34
Video thumbnail
Nanded |इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर; फळबागेतून दरवर्षी लाखोंची कमाई
04:26
Video thumbnail
विलासराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा: विद्यार्थ्यांची कविता #Maharashtra #VilasraoDeshmukh #Marathi
02:48
Video thumbnail
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त NDA बैठकीत मोदींनी नेत्यांसोबत घेतला 'झालमुडी'चा आस्वाद
00:37
Video thumbnail
अभिनेत्री सारा अर्जुनने वडिलांसह घेतले बाबा महाकालांचे दर्शन; उज्जैनच्या 'भस्म आरती'त झाली लीन!
00:30
Video thumbnail
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने गोदावरीत बोट बुडाली; दोन महिलांना गमवावा लागला जीव.
00:34
Video thumbnail
मांजराचा 'दिलजले' अंदाज! गर्लफ्रेंडला दुसऱ्या बोक्यासोबत पाहून उंदराला दिलं जीवदान, व्हिडिओ व्हायरल!
00:23
Video thumbnail
येलदरी जलाशयात मासेमारी नाकारल्याने मच्छीमारांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न
03:22
Video thumbnail
Nanded|कोळशाच्या दलालीत हात काळे करायचे नाही-आ.हेमंत पाटील
03:09
Video thumbnail
Latur|तुकाराम मुंडेंचा धडाका सुरूच; लातूरचे FDA प्रशासन अजूनही झोपेत?
02:05
Video thumbnail
Latur Traffic Police|जीवघेण्या पद्धतीने वाहन अडवणारा ट्रॅफिक पोलीस निलंबित...
02:28
Video thumbnail
Latur MIDC|22 तासांच्या झुंजीनंतर MIDC मधील भीषण आग आटोक्यात; 5 कोटींचे नुकसान
03:48
Video thumbnail
धावत्या बाईकस्वाराला पाडणे पडले महागात; लातूरमध्ये 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर ट्रॅफिक पोलीस निलंबित!
00:19
Video thumbnail
Latur|अण्णा हजारेंचा 90 वा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार
02:13

Latest news