मुंबई : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढला. मात्र, या युद्धाचा फटका अनेक देशांना थेटपणे बसताना दिसत आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे. यासोबतच इराणने मोठा निर्णय घेत महत्वपूर्ण सागरी मार्ग बंद केल्याने टँकर येण्याची संख्या कमी आहे. स्टेट ऑफ होर्मुजवर तेल टँकर ८० टक्के कमी झाल्याचे स्पष्ट झाले. यासोबतच जल मार्गावर हजारो टँकरचा मोठा जाम लागला आहे.
स्टेट ऑफ होर्मुज मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला. यासोबतच येथे टँकर दिसले तर आम्ही आग लावू अशी धमकीही इराणकडून देण्यात आली, ज्यामुळे अनेक देश कोंडीत सापडली आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या, एलपीजी आणि एलएनजी गॅसच्या किंमतीत वाढ होत आहे. यासोबतच भारत देखील तणावात आहे.
कारण सध्याच्या स्थितीला भारतात होणारी ऊर्जेची आयात जवळपास बंद झाली. भारत सरकारकडून स्पष्ट करण्यात आले की, भारताकडे भरपूर सध्या स्टॉक आहे. पुढील २५ दिवस चालेल इतका साठा भारताकडे डिझेल आणि पेट्रोलचा आहे. भारताकडून हे देखील स्पष्ट करण्यात आले की, भारत सध्या इतर पर्यायी गोष्टींसाठी प्रयत्न करत आहे. युद्ध जास्त काळ सुरू राहिले तर स्वयंपाक घरात लागणार एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.
सर्वसामान्य बसणार झळ
ज्याचा परिणाम थेट लोकांच्या घरापर्यंत होईल. तेल कंपन्यांनी यूनिटसोबत एलपीजी गॅसचे उत्पादन वाढवण्यास सुरूवात केली. सरकारकडून स्पष्ट करण्यात आले की, सध्याच्या परिस्थितीला कच्चे तेल, एलपीजी आणि एलएनजीची कोणतीही समस्या नाही. मात्र, असे असले तरीही देशात मोठ्या संख्येने दररोज ऊर्जा लागते, त्याची आयात अत्यंत महत्वाची आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्याच्या घडीला जरी डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती वाढत असल्या तरीही त्याचा कोणताही परिणाम सर्वसामान्य लोकांवर होणार नाही. डिझेल, पेट्रोल आणि गॅसच्या किंमती स्थिर राहतील.
सद्यस्थितीत एलपीजी गॅसची चिंता
मुळात म्हणजे सध्याच्या घडीला भारताची चिंता डिझेल, पेट्रोल नाहीच, एलपीजी गॅस ही चिंता आहे. कारण भारतात ८० टक्के एलपीजी गॅस होर्मुजहून भारतात येते आणि तोच मार्ग इराणकडून बंद करण्यात आला. यासोबतच भारताकडे एलपीजी गॅसचे कोणताही पर्याय नाही. आपल्या देशात ६० टक्के एलपीजी गॅस आयात केला जातो.

