Homeअंतरराष्ट्रीयगाझात कुपोषणाचा विळखा

गाझात कुपोषणाचा विळखा

युद्धात उपासमारीने १२४ मृत्यू बिस्किटांचे पॅकेट ७५० रुपयांना लोक मीठ खाऊन पोट भरतायेत

गाझा सिटी : गाझामध्ये इस्रायल-हमास युद्ध सुरू होऊन २२ महिने झाले आहेत. आतापर्यंत या युद्धामुळे १२४ लोकांचा उपासमारीने मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये ८१ मुले आहेत. फक्त जुलै महिन्यात ४० लोकांचा उपासमारीने मृत्यू झाला, ज्यामध्ये १६ मुले आहेत.

गाझामध्ये वार्तांकन करणा-या पत्रकारांनी सांगितले की, तिथे ५० ग्रॅम बिस्किटाच्या पॅकेटची किंमत ७५० रुपये आहे. पैसे काढण्यासाठी ४५% पर्यंत कमिशन द्यावे लागते. परिस्थिती इतकी वाईट आहे की लोक मीठ खाऊन आणि पाणी पिऊन जगत आहेत. एका पत्रकाराने सांगितले की २१ महिन्यांत माझे वजन ३० किलोने कमी झाले आहे. मला थकवा जाणवतो आणि चक्कर येते. गाझा येथील हिदाया नावाच्या महिलेला कुपोषणामुळे पाठीच्या कण्यातील समस्या निर्माण झाली आहे. तिचा १८ महिन्यांचा मुलगा मोहम्मद झकारिया याचा कुपोषणामुळे पाठीचा कणा दिसत आहे.

गाझा येथील हिदाया नावाच्या महिलेला कुपोषणामुळे पाठीच्या कण्यातील समस्या निर्माण झाली आहे. तिचा १८ महिन्यांचा मुलगा मोहम्मद झकारिया याचा कुपोषणामुळे पाठीचा कणा दिसत आहे. ७ वर्षांचा मोहम्मद आणि १० वर्षांची झीना उपासमारीच्या संकटाचा सामना करत आहेत, त्यांचे कुटुंब पाणी पिऊन त्यांची भूक भागवत आहे. ७ वर्षांचा मोहम्मद आणि १० वर्षांची झीना उपासमारीच्या संकटाचा सामना करत आहेत, त्यांचे कुटुंब पाणी पिऊन त्यांची भूक भागवत आहे.

लोक अनेक दिवसांपासून उपाशी : यूएन
संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे की गाझामधील एक तृतीयांश लोकसंख्येला अनेक दिवसांपासून अन्न मिळत नाही. विविध मानवतावादी संघटनांच्या मते, गाझाची २० लाखांहून अधिक लोकसंख्या पूर्णपणे बा मदतीवर अवलंबून आहे.

मुलांची संख्या वाढतेय
युद्धामुळे गाझामध्ये उपासमारीची अधिकृत घोषणा झालेली नाही, कारण अचूक आकडेवारी उपलब्ध नाही. कुपोषणामुळे मृत्युमुखी पडणा-यांची संख्या वाढत आहे. दक्षिण गाझातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या नासिर हॉस्पिटलमध्ये काम करणा-या एका आरोग्य अधिका-याने सांगितले की, गाझातील प्रत्येकजण उपासमारीच्या संकटाचा सामना करत आहे. कुपोषणामुळे मृत्युमुखी पडणा-या मुलांची संख्या सतत वाढत आहे.

गाझाला हवाई मार्गाने मदत
इस्रायली लष्कराने गाझामध्ये मदत विमानाने पोहोचवण्यास सुरुवात केल्याची पुष्टी केली. शुक्रवारी, एका इस्रायली सुरक्षा अधिका-याने सीएनएनला सांगितले की गाझामधील दुष्काळाच्या संकटावर वाढत्या आंतरराष्ट्रीय टीकेच्या पार्श्वभूमीवर इस्रायल परदेशी देशांना गाझामध्ये मदत विमानाने पोहोचवण्याची परवानगी देईल.

मानवतावादी कॉरिडॉर उघडणार
इस्रायलचे अमेरिकेतील राजदूत येचियल लीटर यांनी नुकतेच सांगितले की, इस्रायली सैन्य रविवारपासून गाझासाठी ‘मानवतावादी कॉरिडॉर’ उघडेल. गाझाच्या लोकसंख्येसाठी मानवतावादी मदत वाढवणे हा त्याचा उद्देश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR