चारठाणा : पंढरपूर येथे जाण्यासाठी निघालेल्या खुशाल देवू राठोड यांच्याशी खडकपाटी येथे कोयत्याच्या पैशावरून वाद घालून डोक्यात दगड मारून डोके फोडल्याची घटना दि.२२ रोजी घडली होती. या प्रकरणी राठोड यांन दि. २७ रोजी चारठाणा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अशोक राठोड याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, अशोक भुजंग राठोड (रा. मालेगाव ता. जिंतुर) याने गुरूवारी सायकाळी ७ वाजेच्या सुमारास खुशाल राठोडहा पंढरपुर येथे जाण्यासाठी निघाला असता खडकपाटी येथे थांबला होता. यावेळी अशोक याने तु इकडे कशाला आला? असे विचारल्यानंतर खुशाल याने संजय रुस्तुम राठोड यास नेण्यासाठी आलो आहे असे म्हणताच संजय तुझ्यासोबत येणार नाही, तू येथून निघ, असे म्हणाला. खुशाल याने संजयला कोयत्याचे पैसे दिलेले आहेत.
मी त्याला घेवुन जाणार आहे असे म्हणताच अशोक याने शिवीगाळ करत डोक्यात दगड मारून खुशालचे डोके फोडले व लाथाबुक्याने मारहाण केली. या प्रकरणी खुशाल राठोड यांच्या फिर्यादीवरुन आरोपी अशोक राठोड याच्याविरूध्द चारठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरिक्षक बालाजी पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सरोदे हे करीत आहेत. या घटनेची सर्वत्र चर्चा होताना दिसून येत आहे.
















