औरंगाबाद : एरवी मागास म्हणून ओळखला जाणारा मराठवाडा कोरोनाच्या तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन साठवणूक आणि निर्मितीमध्ये मात्र परिपूर्ण झालाय. कोरोनाची पहिली लाट आली त्यावेळी मराठवाड्यातील औरंगाबाद घाटी रुग्णालय नांदेड शासकीय रुग्णालय आणि अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयातच केवळ ऑक्सिजनची साठवणूक क्षमता होती. पण पुढे दुस-या लाटेत मराठवाड्याला ऑक्सिजन साठी धावपळ करावी लागली ती सगळ्या महाराष्ट्राने पाहिली. मात्र तिस-या लाटेच्या पाश्र्वभूमीवर मराठवाडा ऑक्सिजन निर्मिती आणि साठवणूक क्षमतेमध्ये स्वयंपूर्ण झाला आहे.
पहिल्या लाटेत मराठवाड्याला ८० मेट्रिक टॅन ऑक्सिजन लागला. साठवण क्षमता खूप कमी होती केवळ मेडिकल कॉलेज वगळता इतर ठिकाणी साठवण क्षमता नव्हती. दुस-या लाटेत २२०मेट्रिक टॅन ऑक्सिजन लागला होता. मराठवाड्यात साठवण क्षमता होती २५० मेट्रिक टन. आता मराठवाड्यात ऑक्सिजनची साठवण क्षमता आहे ८ं४५ मेट्रिक टन आहे आणि सगळे प्रकल्प पूर्णत्वास गेले तर ही क्षमता होईल १२९६ मेट्रिक होईल.
पहिल्या आणि दुस-या लाटेनंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी ऑक्सिजन निर्मिती प्लांटवर भर दिला. जालन्यातील स्टील प्लांट, वेगवेगळे साखर कारखाने यांना ऑक्सिजन निर्मितीसाठी प्रोत्साहन दिलं. नांदेडचा शेवटचा तालुका किनवट , बीडच्या आष्टी पाटोद्यातही साठवण क्षमतेचे टंक उभा केले. यामध्ये एल एम ओ प्लांटची संख्या आणि निर्मिती आणि साठवणूक क्षमता पकडली तर मराठवाड्यात सध्या ८४५ पॉईंट ४१ दोन मेट्रिक टन ऑक्सिजन साठवणूक क्षमता आहे.