कारमधून घेऊन जात असताना कारवाई, औरंगाबादेत कारसह गोळ््या ताब्यात
औरंगाबाद : सध्या देशात अमली पदार्थ तस्करीच्या अनेक घटना समोर येत आहेत. कालच गुजरातमधील द्वारका याठिकाणी कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले. तसेच आर्यन खान ड्रग्स प्रकरणावरून महाराष्ट्रातले राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. असे असताना औरंगाबाद येथे नशेच्या गोळ््या कारमधून घेऊन जाण्याची एक घटना समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाला अटक केली असून संबंधित कारही जप्त केली आहे. याबाबत अधिक चौकशी केली असता संबंधित कार औरंगाबादेतील माजी नगरसेवकाच्या भावाची असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
सय्यद मंजूर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. संबंधित आरोपी कारमधून नशेच्या गोळ््या घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांना मिळाली होती. या माहितीच्या अधारे सीटी चौक पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. पोलिसांनी औरंगाबाद येथील अण्णा भाऊ साठे चौक परिसरात सापळा रचून आरोपीला अटक केली. यावेळी पोलिसांनी आरोपीकडून २६० नशेच्या गोळ््या जप्त केल्या आहेत. १३ स्ट्रीपमध्ये या २६० गोळ््या आढळून आल्या आहेत. पोलिसांनी आरोपी सय्यद मंजूर याच्याकडील गाडी जप्त करून अधिक तपास केला असता संबंधित गाडी औरंगाबादमधील माजी नगरसेवक सय्यद मतीन याचे भाऊ सय्यद मोसीन यांची असल्याचे समोर आले आहे. संबंधित नशेच्या गोळ््या वाहतूक करणारी गाडी नगरसेवकाच्या भावाची असल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी सुरू
केला कसून तपास
संबंधित चारचाकी गाडी आरोपी सय्यद मंजूरकडे कशी आली, नशेच्या गोळ््यांसाठी त्यांनी ही कार का वापरली, कुणाच्या सांगण्यावर अमली पदार्थांची तस्करी केली, यात आणखी कोणाचा सहभाग आहे, अशा विविध प्रश्नांबाबत सध्या गूढ निर्माण झाले असून पोलिस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.
माजी नगरसेवकाच्या भावाची गाडी
नशेच्या गोळ््यांसंदर्भात पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता ज्या कारमधून या गोळ््या घेऊन जात होते. ती कार औरंगाबाद येथील एका माजी नगरसेवकाच्या भावाची असल्याचे समोर आले आहे. माजी नगरसेवक सय्यद मतीन याचे भाऊ सय्यद मोसीन यांची ही असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याच्या राजकीय लिंकचा तपास केला जात आहे.
नशेच्या २६० गोळ््या जप्त
एकमत ऑनलाईन