हिंगोली जिल्ह्यातील धक्कादायक घटना
हिंगोली : हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव याठिकाणी एका गुरांच्या गोठ्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. काल रात्री आठच्या सुमारास लागलेल्या या आगीत १० जनावरांचा बांधलेल्या ठिकाणीच होरपळून मृत्यू झाला आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे बांधलेल्या जनावरांना स्वत:ची सुटकादेखील करता आली नाही. या आगीच्या घटनेत संबंधित शेतकºयाचे तब्बल दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मुद्दाम जनावरांच्या गोठ्याला आग लावली असल्याचा संशय पीडित व्यक्तीने व्यक्त केला आहे. सेनगाव पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. गोठ्यातील चित्र पाहून पोलिसही हैराण झाले आहेत. अशा विचित्र घटनेत लाखो रुपये किमतीची जिवंत जनावरे जळून मेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील रहिवासी असणाºया सचिन बोलवार यांच्या जनावरांच्या गोठ्याला काल रात्री आठच्या सुमारास आग लागली होती. आगीची माहिती मिळताच बोलवार यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्वांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, काही मिनिटातच दहा जनावरे बांधलेल्या ठिकाणीच जळून खाक झाली आहेत. यात चार म्हशी, दोन गिर गाई, दोन बैल, दोन वासरे आणि एक कुत्र्याचा होरपळून मृत्यू झाला.
गुरांच्या गोठ्याला आग, दहा जनावरांचा मृत्यू
एकमत ऑनलाईन