25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeनांदेडबारावी : नांदेडात टक्केवारीत मुलींची बाजी

बारावी : नांदेडात टक्केवारीत मुलींची बाजी

एकमत ऑनलाईन

नांदेड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा ऑनलाइन निकाल बुधवार, दि. ८ जून रोजी दुपारी जाहीर केला. नांदेडचा निकाल ९३.७६ टक्के लागला असून उतीर्ण होण्यात मुलांची संख्या जास्त असली तरी उत्तीर्णांच्या टक्केवारीत मुलींची बाजी मारली आहे. बारावी परीक्षेसाठी ३९ हजार ५३५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात परीक्षा दिलेल्या पैकी ३६ हजार ६०३ विद्यार्थी उर्तीण झाले आहेत.

कोरोना संकटामुळे बारावीच्या परीक्षा पंधरा दिवस उशीराने झाल्या होत्या. यामुळे निकालही अपेक्षेप्रमाणे उशीरा लागला. यंदा नांदेडचा ९३.७६ टक्के निकाल लागला आहे. बारावीसाठी कला, विज्ञान,वाणिज्य व व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेतील सुमारे ३९ हजार ५३५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात २२ हजार २५ मुले व १७ हजार १० मुली अशा ३९ हजार ०३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

चारही शाखेतील मिळून ३६ हजार ६०३ विद्यार्थी उतीर्ण झाले. यात २० हजार ३३५ मुले व १६ हजार २६८ मुलींचा समावेश आहे. यंदा उतीर्ण होण्यात संख्येच्या बाबतीत मुले पुढे आहेत तर टक्केवारीत मुलींची बाजी मारली आहे. उतीर्ण मुलांची टक्केवारी ९२.३२ अशी तर मुलींची टक्केवारी ९५.६३ आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या