26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमराठवाडाबीड जिल्ह्यात अपघात, १ ठार, ९ जण गंभीर

बीड जिल्ह्यात अपघात, १ ठार, ९ जण गंभीर

एकमत ऑनलाईन

बीड : जिल्ह्यात रस्ते अपघाताची मालिका सुरूच आहे. आज पहाटे ३ च्या सुमारास सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रॅव्हल्सने पिकअप टेम्पोला जोराची धडक दिली. या अपघातात १ जण जागीच ठार झाला तर ९ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संत सावता महाराज यांच्या श्री. क्षेत्र अरण येथे बीड जिल्ह्यातील संत सावता महाराजांची ज्योत घेऊन जाणा-या भाविकांच्या पिकअप टेम्पोला जळगाव येथे ट्रॅव्हल्सने जोराची धडक दिली. यामध्ये हनुमंत आण्णासाहेब आगरकर (४२) यांचा जागीच मृत्यू झाला. तर विश्वंभर देविदास अंतरकर, शैलेस जानकीराम कातखडे, ऋषीकेश परमेश्वर आगरकर, महादेव बबन जावळे, परमेश्वर आस्मान पांगरे, रविराज भाऊसाहेब आगरकर, गजानन बंडु वाघमारे, नंदू भाऊसाहेब आगरकर, बाळू भारत आगरकर हे जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ते आजीनाथ गवळी यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दरम्यान, अपघातातील मयत हनुमंत आगरकर यांच्या नातेवाईकांनी मयताचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेत एक नवा आदर्श ठेवला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या