25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeबीडबीड जिल्ह्यात सशस्त्र दरोडा

बीड जिल्ह्यात सशस्त्र दरोडा

एकमत ऑनलाईन

बंदुकीचा धाक दाखवून ९ लाखांची रोकड,५ तोळे सोने लंपास
बीड : बीड जिल्ह्यातून दरोड्याची प्रचंड भयानक घटना समोर आली आहे. बंदुकीचा धाक दाखवत ८ ते १० दरोडेखोरांनी ९ लाखांची रोख रक्कम आणि ५ तोळे सोने पळवून नेले आहे. दरोडेखोरांची एवढी मोठी हिंमत होतेच कशी, त्यांना पोलिसांची भीती राहिलेली नाही का? असा प्रश्न या घटनेच्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. दरोडेखोरांनी चोरी करताना दाम्पत्यास बेदम मारहाणदेखील केल्याची माहिती समोर आली आहे. या भयानक आणि धाडसी चोरीच्या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेतील आरोपी चोर हे सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले आहेत.

बीडच्या वडवाडी गावात बंदुकीचा धाक दाखवून ८ ते १० जणांनी सशस्त्र दरोडा टाकला आहे. यावेळी दरोडेखोरांनी बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचे प्रमुख अभिमान अवचर यांचे कार्यालय आणि घरी धाडसी दरोडा टाकून पती-पत्नीला बेदम मारहाण करत ९ लाख रुपये रोख आणि ५ तोळे सोने चोरून नेले आहे. ही घटना काल मध्यरात्रीच्या दरम्यान घडली आहे.

या घटनेने वडवाडीच्या बालाघाट परिसरात एकच खळबळ उडाली. संबंधित घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांसह एलसीबीचे अधिकारी, पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी श्वानपथकालादेखील पाचारण करत पाहाणी करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी बीडच्या नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या