औरंगाबाद : क्वारंटाईन सेंटरमध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी ठेवलेले तब्बल १ कोटी रुपयांचे सामान गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या क्वारंटाईन सेंटरमधून टीव्ही, फ्रिज, रेडिओ अशा प्रकारचे सामान गायब झाले आहे. गायब झालेल्या सामानामध्ये फ्रिज, टीव्ही, संगणक, फॅनचा समावेश आहे. संपूर्ण राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना जागोजागी क्वारंटाईन सेंटर्स उभारण्यात आले होते. औरंगाबादेतसुद्धा कोरोनाला थोपवण्यासाठी स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या उपाययोजना केल्या गेल्या.
यावेळी शहरात जागोजागी क्वारंटाईन सेंटर्स उभारण्यात आले. शाळा, कॉलेज, सार्वजनिक इमारती यांना खाली करून तेथे कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या नागरिकांना ठेवण्यात आले. यावेळी नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून औरंगाबाद पालिकेने क्वारंटाईन सेंटर्सना टीव्ही, फ्रिज, रेडिओ, गाद्या, उशा असे सगळे काही पुरवले होते़आता कोरोनाचा संसर्ग ब-यापैकी आटोक्यात आला आहे. त्यामुळे आता शहरातील बहुतांश क्वारंटाईन सेंटर्स रिकामे झाले आहेत.
आता ऑनलाईन पास विना मिळणार विठ्ठलाचे दर्शन