37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeमराठवाडापूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी २ जण ताब्यात

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी २ जण ताब्यात

एकमत ऑनलाईन

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करीत यवतमाळ आणि बीडमधून २ तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोन्ही तरुणांची कसून चौकशी केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी अखेर पुणे पोलिसांनी २ जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी नेमण्यात आलेल्या पोलिस पथकाच्या टीमने यवतमाळ आणि बीडमध्ये जाऊन २ जणांना ताब्यात घेतले आहे.

या दोघांना सध्या चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यामध्ये एक जण हा अरुण राठोडचा नातेवाईक असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या प्रकरणी आणखी नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे. अरुण राठोड हा गेल्या काही दिवसांपासून गायब आहे. कथित ऑडिओ क्लिपमध्ये अरुण राठोडचा आवाज असल्याचे सांगितले जात आहे.

भाजपच्या नाराज सरपंचाचा राजीनामा
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील काळवटी तांडा येथील सरपंच कमल नाथराव यांनी भाजपवरच गंभीर आरोप करत राजीनामा दिला आहे. भाजपचे अनेक नेते आणि वरिष्ठ मंडळी ही ओबीसी आणि बंजारा समाजातील उच्चपदस्थ संजय राठोड यांना संपवण्याचा कट रचला जात आहे. त्यामुळे आपण भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा देत आहे, असे नाथराव यांनी जाहीर केले आहे.

भाजपच्या नेत्यानेच केल्या ऑडिओ क्लिप व्हायरल?
गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणात तब्बल १२ ऑडिओ क्लीप समोर आल्या आहेत. भाजपच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने अरुण राठोडकडून या ऑडिओ क्लीप काढून घेतल्याचे समोर येत आहे. तसेच त्याचवेळी त्यांच्या फोटो आयडीचे फोटो काढून घेतल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय ज्या कार्यकर्त्याने या क्लीप अरूण राठोडकडून घेतल्या तोदेखील आता माध्यमांसमोर येण्याचे टाळत आहे, असेही सांगितले जात आहे.

खा. उदयनराजे भोसले मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भेट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या