बीडमधील कोरोनाचा आकडा आता 11 वर पोहोचला
बीड :बीड जिल्ह्यात सकाळी 77 जणांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचे रिपोर्ट प्राप्त झाले असून 73 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. उर्वरित दोघाचे सॅम्पल पुन्हा तपासणीला पाठवले जाणार आहेत. दोन नवीन रुग्ण सापडल्याने बीडमधील कोरोनाचा आकडा आता 11 वर पोहोचला आहे
73 जणांचे अहवाल निगेटिव्ह
बीड जिल्ह्यात तीन दिवसात कोरोनाचा आकडा 11 वर पोहोचला आहे. या पैकी एका महिलेचा मृत्यू झाला. आज सोमवारी एकूण 77 जणांचे सॅम्पल तपासणी साठी पाठवण्यात आले होते. त्या पैकी 73 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
Read More निलंग्यात 6 कोरोना पॉजिटीव्ह आढळले
सॅम्पल पुन्हा एकदा तपासणीसाठी पाठवले जाणार
आज पुन्हा दोघे जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, तर दोघा जणांचे सॅम्पल पुन्हा एकदा तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. एका मयत महिलेवर आज बीडमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले त्या कुटूंबातील सहा जण उपचारासाठी आता पुण्याकडे रवाना झाले आहेत.