मुंबई : कोरोनाचा सामना करण्यासाठी नागरिकांनी लस तयार होण्याची वाट पाहू नये. फ्रंटलाईन वॉरिअर बनून स्वत:ची आणि कुटुंबियांची काळजी घेतली पाहिजे, असं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे उपसंचालक पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी म्हटलं आहे. प्रत्येकाला फ्रंटलाईन वॉरिअर बनण्याची संधी आहे. कोरोनाची प्रतिबंधात्मक लस तयार करण्यासाठी जगभरात संशोधन सुरु आहे. मोठ्या प्रमाणात त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सगळं सुरळीत व्हायला 2021 उजाडणार आहे, असं रमण गंगाखेडकर यांनी म्हटलं आहे.
लॉकडाऊनमुळे लोकांना नवीन सुरक्षित जीवनपद्धती समजली असेल. या सुरक्षित जीवनशैलीचं लोक यापुढे पालन करतील अशी सरकारला अपेक्षा आहे, म्हणून सरकारने लॉकडाऊन उठवलं असल्याचं यांनी सांगितलंय.
दरम्यान, कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी योग्य खबरदारी घेणे गरजेचं आहे. कोरोनासंदर्भात हात स्वच्छ धुणे, मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिगं ठेवणे असा नियमांचं पालन न करणे योग्य होणार नाही, असं रमण गंगाखेडकर यांनी सांगितलं.
Read More कोरोना रूग्णांचे व्दिशतक, ११ जणांचा मृत्यू