28 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeऔरंगाबादऔरंगाबाद, जालन्यात ६२ नवे कोरोनाबाधित रूग्ण

औरंगाबाद, जालन्यात ६२ नवे कोरोनाबाधित रूग्ण

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद: वृत्तसंस्था
औरंगाबाद आणि जालन्यात आज दिवसभरात ६२ रुग्ण सापडले आहेत. त्यात औरंगाबादमधील ३८ तर जालन्यातील २४ रुग्णांचा समावेश आहे. तर जालन्यात मुंबईहून आलेल्या पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.
औरंगाबादमध्ये आणखी एका कोरोनाबाधित ज्येष्ठ नागरिकाचा उचारादरम्यान शहरातील खासगी रुग्णालयामध्ये मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्युची संख्या ६६ झाली आहे, तर आज दुपारपर्यंत ३८ बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १४०० झाली आहे.

सादातनगर परिसरातील ७२ वर्षीय वृद्धाला २५ मे रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णाचा स्वॅब घेण्यात आला होता आणि स्वॅब रिपोर्टवरुन संबंधित वृद्ध हा कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान, न्यूमोनिया व मल्टिआॅर्गन फेल्युअरमुळे रुग्णाचा २७ मे रोजी रात्री मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्युची संख्या ६६ झाली आहे. यामध्ये आतापर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) ५६, दोन खासगी रुग्णालयांमध्ये ८ व जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे.

Read More  देशात चोवीस तासांत ६,५६६ नवे रुग्ण, १९४ जणांचा मृत्यू

तर जालना जिल्ह्यात आज एकाचवेळी एकूण २४ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जालन्यातील कोरोना रुग्णांची संख्या ११० वर पोहचली आहे. या २४ जणांमध्ये अंबड तालुक्यातील मठ पिंपळगाव येथील ६ जणांचा समावेश असून अंबड येथील शारदा नगर मधील ५, बदनापूर तालुक्यातील काटखेडा येथील ५, बदनापूर शहरातील एकाचा, राज्य राखीव दलातील एका जवानाचा आणि कोविड केअर सेंटरमधील ६ जणांचा समावेश आहे. मुंबईच्या घाटकोपरमधून अंबडला आलेल्या ५ जणांनाही कोरोनाची लागण झाली असल्याचे आढळून आले आहे़ दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ४० जण कोरोनामुक्त झाले असून, ७० जणांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, जालन्यातील बाजारात भयंकर मोठी गर्दी होत आहे. औरंगाबाद शहर व ग्रामीण भागातील छोटे व्यापारी जालन्यातील होलसेल मार्केटमधून किराणा, कटलरी, शेती बियाणे, औषधी खरेदी करण्यासाठी मोठी झुंबड करत आहेत. त्यामुळे वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे प्रशासनाच्या आवाक्याबाहेर गेले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या