24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeमराठवाडा६ जिल्ह्यांत ६९ मृत्यू; २,७०९ नवे रुग्ण तर ३,७०५ रुग्ण कोरोनामुक्त

६ जिल्ह्यांत ६९ मृत्यू; २,७०९ नवे रुग्ण तर ३,७०५ रुग्ण कोरोनामुक्त

एकमत ऑनलाईन

लातूर/नांदेड : मराठवाड्यातील ६ जिल्ह्यात मिळून गुरुवारी २७०९ नवे रुग्ण आढळले. बुधवारशी तुलना करता २३३ अधिक नवे रुग्ण आढळले. गुरुवारी ३७०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. बुधवारशी तुलना करता हे प्रमाण ३०४ ने कमी आहे. एकुणच गेल्या काही दिवसांत नवीन रुग्ण व कोरोनामुक्त रुग्ण यांच्यातील फरक कमी होत चालला आहे. आकडेवारीवरुन असे दिसून येते की संसर्गाचे प्रमाण तर कमी झाले आहे. मात्र यापेक्षाही अधिक वेगाने संसर्ग कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. बुधवारपेक्षा मृत्यूसंख्येत एकुण १६ ने घट नोंदली गेली हीच दिलासादायक बाब आहे. गुरुवारी ६ जिल्ह्यांत मिळून साधारण ६९ रुग्णांचा मृत्यू झाला. संसर्ग अजून वेगाने कमी होण्यासाठी नागरिकांचे समुपदेशन, त्याला नागरिकांचेही संपुर्ण सहकार्य व आरोग्य यंत्रणेची अधिक चांगली कामगिरी असे एकत्रित प्रयत्न घडून येणे आवश्यक आहे.गुरुवारी लातूर जिल्ह्यात ६२२ नवे रुग्ण तर ३२ मृत्यू झाले.

हिंगोली जिल्ह्यात गुरुवारी १०३ नवीन रुग्ण आढळले. मंगळवारपेक्षा ही संख्या ३७ ने कमी आहे. बुधवारी १४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. मंगळवारपेक्षा ही संख्या १४ ने कमी आहे. गुरुवारी बुधवारपेक्षा मृत्यूची संख्या ५ ने कमी होत केवळ २ रुग्णांचा मृत्यू झाला. नवीन रुग्णांची संख्या कमी, कोरोनामुक्तांची संख्या किंचित कमी व मृत्यूच्या प्रमाणात चांगलीच घट ही दिलासादायक आहे. मात्र सातत्याने चढउतार होणे बंद होण्याची गरज आहे. परभणी जिल्ह्यात गुरुवारी मंगळवारपेक्षा १०० ने अधिक म्हणजे ४७८ नवे रुग्ण आढळले. तर १०० ने कमी म्हणजे ८२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. मृत्यूसंख्येतही चांगलीच घट झाली. बुधवारी १८ मृत्यू झाले असताना गुरुवारी त्यात ७ ने घट होत ११ रुग्णांचा मृत्यू झाला. गेले दोन दिवस सलग मृत्यूच्या प्रमाणात वाढ होत असताना गुरुवारी झालेली घट दिलासादायक आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात गुरुवारी रुग्णसंख्येत वाढ झाली. गुरुवारी बुधवारपेक्षा साधारण १५० अधिक म्हणजे ६२३ नवे रुग्ण आढळले. गुरुवारी बुधवारपेक्षा २१० अधिक म्हणजे ७३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. मृत्यूसंख्येतही ५ ने घट होत ८ रुग्णांचा मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात सातत्याने संसर्गात चढ-उतार सुरु आहे.
जालना जिल्ह्यात बुधवारपेक्षा २०० जास्त म्हणजे ५९१ नवे रुग्ण आढळले. कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही तब्बल ६०० ने कमी म्हणजे ३०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. मृत्यूसंख्येत मात्र एकाने वाढ होत ११ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना संसर्गात चढउतार कायम सुरु आहे.

नांदेडमध्ये पुन्हा मोठी रुग्णघट
नांदेड जिल्ह्यात बुधवारपेक्षा १०० कमी म्हणजे २९२ नवे रुग्ण आढळले, तर २१० अधिक ६९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. गेल्या ३ दिवसांत मिळून १५ जणांचा (१ ने घट)मृत्यू झाला. नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट व कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. मृत्युसंख्येच्या प्रमाणातही किंचित घट झाली. जिल्ह्याच्या कोरोना संसर्गात चांगली घट दिसून आली.

महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या