32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeउद्योगजगतबजाजमधील ७९ कर्मचाऱ्यांना कोरोना : मराठवाड्याच्या राजधानीला लागले ‘ग्रहण’

बजाजमधील ७९ कर्मचाऱ्यांना कोरोना : मराठवाड्याच्या राजधानीला लागले ‘ग्रहण’

एकमत ऑनलाईन

दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू : शनिवारी आणि रविवारी दोन दिवस कंपनी बंद ठेवण्यात येणार

औरंगाबाद : औरंगाबाद वाळूंज एमआयडीसीतील  बजाज कंपनीत काम करण्याऱ्या ७९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी आणि रविवारी दोन दिवस कंपनी बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती कंपनी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

औरंगाबादमध्ये २५ जूनला एका दिवसात २३० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. नव्या रुग्णांमध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रातील १२४ आणि ग्रामीण भागातील १०६ जणांचा समावेश आहे. तर १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४२६६ कोरोनाबाधित रुग्ण असून २२१७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर १६०१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत २१८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची बाधा झालेल्यांमध्ये ७७ महिला आणि १५३ पुरूषांचा समावेश आहे.

Read More  संपादकीय : लोकानुनयाचे ‘ट्रम्प कार्ड’!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या