32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeमराठवाडाबीड शहरात ८ स्पॉट कंटेन्मेंट झोन घोषित

बीड शहरात ८ स्पॉट कंटेन्मेंट झोन घोषित

एकमत ऑनलाईन

बीड : बीड शहरातील विविध ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे या 8 भागात कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

बीड शहरातील कटकटपुरा येथील अंकुश रामराव नाईकवाडे यांचे घर ते लक्ष्मीबाई श्रीराम लोखंडे यांच्या

घरापर्यंत चा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. अजीज पुरा खंदक येथील हमसफर किराणा ते सैफ कटपीस सेंटर पर्यंत चा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. कारंजा खंदक येथील हमेरा सुट मटेरियल ते हमीद जेन्टस पार्लर पर्यंत चा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. हत्तीखाना येथील अभय कालिदास देशमुख यांचे घर ते काझी युसुफ जागीरदार यांच्या घरा पर्यंत चा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. काळे गल्ली येथील राजेश यादव यांचे घर ते संजय यादव यांच्या घरापर्यंत चा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. हाफिज गल्ली येथील इमरान खान मोहब्बत खान यांचे घर ते शेख फिरोज शेख मेहबुब यांच्या घरापर्यंतचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला.

लोहार गल्ली येथील सय्यद शफिक सय्यद असफिया ते लोहार गल्ली मस्जिद पर्यंत चा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच कोरडे गणपती मंदिर काळे गल्ली येथील देविदास देशमुख यांच्या घरापासून ते गायत्री गजानन बेहरे यांच्या घराच्या घरापर्यंत (मंदिराच्या आतील 13 घरे) हा परिसर. घरापासून ते गायत्री गजानन बेहरे यांच्या घराच्या घरापर्यंत (मंदिराच्या आतील 13 घरे) हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून वरील या सर्व ठिकाणी अनिश्चित कालावधीसाठी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला असून वरील तिन्ही ठिकाणच्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याच बरोबर बीड शहरातील राजुरी वेस ते कोतवाली वेसच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये बरेच कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे 10 जुलै 2020 पासून प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्यरत करण्यात आली होती.

जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी अहवाल सादर केला असून या परिसरातील प्रतिबंधात्मक व्यवस्था शिथिल करण्यात येत आहे.राज्य शासनाने लॉकडाऊन कालावधी 31 जुलै 2020 पर्यंत वाढविला असल्याने त्या अनुषंगाने जिल्ह्यात दिनांक 31 जुलै 2020 रोजीच्या रात्री 12 पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड सहिताचे कलम 144 लागू करण्यात आले आहेत.

Read More  कळमनुरी : रुग्ण आढळल्याने रेडगाव सील

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या