30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeबीडबीडमध्ये लग्नाळू तरुणांना फसवणारी टोळी

बीडमध्ये लग्नाळू तरुणांना फसवणारी टोळी

एकमत ऑनलाईन

बीड : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात एका तरुणाकडून लग्न लावण्यासाठी तब्बल १ लाख ६० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर तरुणाने प्रथम मध्यस्थाला ८० हजार रुपये दिले. मात्र लग्नानंतर बायकोला सोबत ठेवण्यासाठी पुन्हा ८० हजारांची मागणी केल्यानंतर त्याने पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी नवरीसह तिघांना ताब्यात घेतले. त्यांना रविवारी (दि.१४) न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान अटक केलेल्यांच्या चौकशीतून ही एक टोळीच असल्याचे उघडकीस आले आहे.

आष्टी तालुक्यातील शिराळ येथील हा पीडीत तरुण आहे. लग्न जमविण्यासाठी मध्यस्थाने तरुणाकडे ८० हजार रुपयांची मागणी केली. ती पुर्ण केल्यानंतर त्याचे तरुणीबरोबर लग्न लावण्यात आले. मात्र नंतर सोबत राहण्यासाठी ती तरुणी त्याला ८० हजारांची मागणी करु लागली. पैसे न दिल्यास बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकी देण्यात आली. मात्र तरुणाने त्याला न भिता पोलिसांना तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ घटनेची दखल घेतली. सापळा रचून तरुणाकडून ५० हजार रुपये घेताना एक महिला व एका पुरुषाला ताब्यात घेतले. तसेच पत्नीलाही ताब्यात घेतले. तपासात याच तिघांनी अशाप्रकारे ७-८ तरुणांना गंडा घातल्याची कबुली दिली आहे.

 

बंटी – बबलीचा विद्यापीठात धुमाकूळ !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या