28 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeमराठवाडाजालन्यात चिंता वाढली 118 नव्या रुग्णांची भर

जालन्यात चिंता वाढली 118 नव्या रुग्णांची भर

एकमत ऑनलाईन

जिल्ह्याचा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1399 वर गेली

जालना  : जालना शहरात कोरोनाचा उद्रेकच सुरू असून रविवारी सर्वाधिक 118 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने जालना जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे. आता जालना जिल्ह्याचा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1399 वर गेली आहे.

कोणत्या भागात सापडले कोराना रुग्ण

जालना शहरात रविवारी लक्कडकोटमध्ये 26, संभाजीनगर 18, महसूल कॉलनी 8, रामनगर 7, मंगळबाजार 5, बरवार गल्ली, पाणीवेस 5, भिमनगर 4, लोधी मोहल्ला 4, मोदीखाना 4, जेईएस कॉलेज जवळ 3, राज्य राखीव पोलीस बल कॉलनी 2, कडबा मंडी 2, भाग्यनगर 4, समर्थनगर 2, नळगल्ली 1, अण्णाभाऊ साठेनगर 1, अमरछाया टॉकीज जवळील 1, दुःखीनगर 1, पुष्पकनगर 1, अंजठानगर 1, अर्चनानगर 1, हडप सावरगाव ता. जालना 1, विठ्ठल मंदिर कसबा 7, प्रियदर्शनी कॉलनी, लक्ष्मीनारायणपुरा 1, मस्तगड 5, गोंदी 1, जमुनानगर 1 असे एकूण 118 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली.

जालना जिल्ह्यात आज 72 जणांना डिस्चार्ज

जालना शहरात रविवारी काद्राबाद, गणेशगिरी, पाणीवेस, क्रांतीनगर, खिश्चन कॉलनी, सदर बाजार, पोस्ट ऑफीसजवळ, नेहरु रोड प्रत्येकी 1, तुळजाभवानीनगर 2, रामनगर 1, नळगल्ली 1, गुडला गल्ली 1, आदित्यनगर 1, भाग्यनगर 1, कसबा 1, शंकुतलानगर 1, व्यंकटेशनगर 1, रामनगर 1, मंमादेवी परिसर 3, संभाजीनगर 13, कन्हैयानगर 4, एस.टी. कॉलनी 2, माणिकनगर 1, खवामार्केट 2, टेंभुर्णी 5, ढोरपुरा 8, तट्टुपुरा 1, चौधरीनगर 5, गवळी मोहल्ला 6, पेन्शनपुरा 1, माळीपुरा 1, माऊलीनगर 1, शास्त्री मोहल्ला 1 अशा एकूण 72 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Read More  कोरोनामुळे ग्रामीण भागात अस्वस्थता वाढली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या