बीड : राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बीड जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून प्लॅन ‘बी’ तयार केला आहे यानुसार कोरोनाचे रुग्ण वाढल्यास त्यांच्यावर सहज उपचार होईल. यासाठी अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथे आरोग्य विभागाने 1 हजार 365 बेडचे कोरोना सेंटर तयार केले आहे. यात स्वतंत्र बंदिस्त कक्ष, प्रत्येक कक्षात ऑक्सिजन पाईप, व्हेंटिलेटर, स्वतंत्र पॅथॉलॉजी लॅब सुरु करण्यात आली आहे. केवळ महिनाभराच्या काळात हे कोरोना सेंटर उभं करण्यात आलं आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा 87 वर पोहचला आहे. यापैकी आतापर्यंत 64 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयात 21 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. बीडच्या मसरत नगरमध्ये रुग्ण आढळल्यामुळे मसरत नगर परिसर सील करण्यात आली आहे. परळीतील रेशन दुकानदाराला कोरोनाची लागण झाल्यानंतरही परळी शहरातील 3 कॉलनी सील करण्यात आल्या आहेत.
Read More किमच्या बहिणीने दिली हल्ल्याची धमकी : कोरियासोबत बिघडलेले संबंध यावरुन हल्लाबोल