24.2 C
Latur
Thursday, March 4, 2021
Home क्राइम पीपीई किट घालून चोरी; सीसीटिव्हीत झाला कैद

पीपीई किट घालून चोरी; सीसीटिव्हीत झाला कैद

एकमत ऑनलाईन

बीड: कोरानाच्या संकटकाळात चोर मोठ्याप्रमाणात अपडेट होऊन चोºया करत आहेत. डॉक्टर आणि कोरोना व्हायरस पासून स्वत:चे बचाव करण्यासाठी पीपीई किट घालून रुग्णांची सेवा करताना आपल्याला दिसतात. मात्र बीडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका चोराने पीपीई किट घालून चक्क मेडिकलमध्ये जाऊन चोरी केली असल्याचं समोर आलं आहे. चोराने केलेली चोरी मात्र मेडिकलमधील सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाली असून या फुटेजद्वारे पोलिस चोराचा माग घेत आहेत.

चोरट्याने ठेवलेली रोकड केली लंपास
पीपीई किट घालून चोराने शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात असलेल्या दीपक अहुजा यांच्या मेडिकलमध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान चोरी केली आहे. चोराने चोरी करताना आपण पकडले जाऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पीपीई किट घालून चोरी केली आहे. सदर चोराने मेडिकलमध्ये ठेवलेली ५० ते ६० हजार रुपयाची रोकड चोरी केली असल्याची माहिती मिळाली आहे. ही चोरी पुर्वनियोजीत असल्याचे म्हटले जात आहे. दोन दिवस पाहणी केल्यानंतरच हा प्रकार घडला आहे.

आणखी कोणी सामिल असल्याचा संशय
दरम्यान हा चोर एकटाच असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कारण सीसीटीव्ही कॅमेºयात फक्त एकजणच दिसत आहे. दुसरा कोणीही दिसत नाही. त्यामुळे एकट्याच चोराने दुकानाचे कुलूप तोडल्याचं बोललं जात आहे. दरम्यान चोर ओळखीचा असावा असा देखील संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान डॉक्टर आणि कोरोना व्हायरसपासून स्वत:चे बचाव करण्यासाठी पीपीई किट घालून रुग्णांची सेवा करताना आपल्याला दिसतात. मात्र चोर देखील पीपीई किटचा वापर चोरी करण्यासाठी करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

राज्यात १९ हजार २१८ नवे रुग्ण, २ लाख ११ हजारांवर उपचार सुरू !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या