26.4 C
Latur
Friday, May 20, 2022
Homeमराठवाडामराठवाड्यात भाजपला सर्वाधिक जागा

मराठवाड्यात भाजपला सर्वाधिक जागा

राष्ट्रवादी दुस-या क्रमांकावर, रावसाहेब दानवे, धनंजय मुंडेंना धक्का

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : राज्यभरातील नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले असून, मराठवाड्यात भाजप एक नंबरचा पक्ष ठरला आहे, तर सत्तेत क्रमांक एकचे पद असलेल्या शिवसेनेला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे दुस-या क्रमांकावर राष्ट्रवादी तर तिस-या क्रमांकावर काँग्रेस पक्षाला स्थान मिळाले आहे. भाजपने १०२ जागांवर विजय मिळवत पहिले स्थान मिळवले आहे. मात्र, मराठवाड्यात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि मंत्री धनंजय मुंडे यांना धक्का बसला. कारण सोयगाव नगर पंचायतीवर शिवसेनेने बाजी मारली, तर बीड जिल्ह्यातील पाचपैकी चार नगर पंचायतीवर भाजपने बाजी मारली. त्यामुळे धनंजय मुंडेंना धक्का बसला.

नगर पंचायत निकालाच्या आलेल्या आकडेवारीनुसार भाजप १०२, राष्ट्रवादी ९४, काँग्रेस ८०, शिवसेना ७४, आणि इतर ४१ जागांवर विजयी झाले आहेत. त्यामुळे राज्यात सत्तेत असलेल्या तीनही पक्षांना मागे टाकत भाजपने मराठवाड्यात आपले पहिले स्थान मिळवले आहे.

एमआयएम, वंचितनेही खात उघडले
राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप या महत्त्वाच्या पक्षाबरोबरच एमआयएमने ५ , वंचित बहुजन आघाडी ०२, रासप ०५ आणि प्रहार संघटनेला ०६ जागांवर विजय मिळवता आला आहे.

कोणत्या जिल्ह्यात
कुणाला किती जागा?
-औरंगाबाद
शिवसेना : ११, भाजप : ०६
————
-जालना
राष्ट्रवादी : ३४, शिवसेना : २२, भाजप : १४, काँग्रेस : ०९, इतर : ०६
————
-बीड
भाजप : ४७, शिवसेना :०२, राष्ट्रवादी :२१, काँग्रेस :०५, इतर :१०
————
-उस्मानाबाद
भाजप : १०, शिवसेना :१६, राष्ट्रवादी :०२, काँग्रेस :४, इतर :२
————
-लातूर
भाजप : १४, शिवसेना : ६, राष्ट्रवादी : १४, काँग्रेस : २३, इतर :११
————
-नांदेड
भाजप : ३, शिवसेना : ३, राष्ट्रवादी : ८, काँग्रेस : ३३, इतर : ४
————
परभणी (पालम)
भाजप : १, शिवसेना : ००, राष्ट्रवादी : १०, काँग्रेस : ००, इतर : ०६
————
हिंगोली
भाजप : ०७, शिवसेना : १४, राष्ट्रवादी : ०५, काँग्रेस : ०६, इतर : ०२
————
मराठवाड्यातील एकूण जागा
भाजप १०२, शिवसेना ७४, राष्ट्रवादी ९४, काँग्रेस ८० आणि इतर ४१

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या