30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeबीडबीड डीसीसी निवडणुकीतून भाजपची माघार; पंकजा मुंडेंचा निर्णय

बीड डीसीसी निवडणुकीतून भाजपची माघार; पंकजा मुंडेंचा निर्णय

एकमत ऑनलाईन

बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे सत्तेचा गैरवापर करत आहेत, असा आरोप करत बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवर भाजपने बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली. शनिवारी जिल्हा बँकेची निवडणूक होणार आहे. निवडणूक लढवूनही फोरम पूर्ण होत नसल्याने बहिष्कार घालण्याचा निर्णय पंकजा मुंडे यांनी घेतला आहे. या अगोदर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात पंकजा मुंडें यांनी थेट राज्यपालांकडे तक्रार केली होती. जिल्हा बँकेच्या ११ जागेवरील अर्ज बाद झाले होते. त्यामुळे ८ जागेसाठी ही निवडणूक होत आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज बाद करून अधिका-यांनी निवडणूक लढण्यास अटकाव घातला. यावरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी टीका केली आहे.

सहकार मंत्र्यांना हाताशी धरुन कारस्थान
सहकार मंत्र्याला हाताशी धरून भाजपच्या लोकांना निवडणुक लढू न देण्याचा प्रकार सुरु आहे. औरंगाबाद आणि इतर जिल्ह्यांना जो न्याय दिला, तो बीडला नाही हे दुर्दैव आहे. सत्ताधा-यांनी जिल्हा बँक बरखास्त करण्याचे कट कारस्थान सुरू केले असून आम्ही सर्व जातीने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उतरले असताना देखील पूर्ण होत नसल्यामुळे निवडून आलेल्या सभासदांचे कालावधी अल्पकाळ असेल. त्याचबरोबर प्रशासक येण्याचे चिन्ह देखील आहेत, त्यामुळे आम्ही या निवडणुकीत माघार घेत असून उद्या कोणीही आमच्याशी संबंधी निवडणुकीत सहभागी होणार नाही असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले. बुडालेली जिल्हा बँक सुरळीत करण्याचे काम गेल्या पाच वर्षांमध्ये केले. मात्र सत्ताधारी पक्ष सत्तेचा गैरवापर करत असून बँकेचं वाटोळे करण्याचे त्यांनी ठरविल्याचा आरोपही पंकजा मुंडे यांनी केला.

धनंजय मुंडेंकडूनही पंकजांना टोला
कोणी निवडणुकीवर बहिष्कार घातला, कुणाला मागील कारभाराचा पश्चाताप झाला किंवा कुणी माघार घेतली तरीही निवडणुकीला शंभर टक्के क्षमतेने सामोरे जाऊन मतदान प्रक्रिया पार पाडावी असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीच्या पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनीही मोठ्या प्रमाणात मतदान करुन घ्यावे, असे आवाहनही मुुंडे यांनी केले.

गावात १० रुपयांना मिळणार एलईडी बल्ब

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या