25.1 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home मराठवाडा 11 ऑक्टोबरपासून परळीत रोखठोक आंदोलन, मराठा समाजाचा सरकारला इशारा

11 ऑक्टोबरपासून परळीत रोखठोक आंदोलन, मराठा समाजाचा सरकारला इशारा

एकमत ऑनलाईन

बीड : राज्य सरकारने येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटवावा, अन्यथा येत्या 11 ऑक्टोबरपासून परळीत रोखठोक आंदोलन सुरु करण्यात येईल, असा निर्णय मराठा आरक्षणाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात परळीत मराठा क्रांती रोखठोक मोर्चाची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मराठा समाजाच्या आरक्षणावरील स्थगिती उठविण्यात यावी यावर महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. या बैठकीला परळी तालुक्यातील सर्वच समन्वयक उपस्थित आहेत.

राज्य सरकारला मराठा आरक्षण देण्यासाठी केवळ 10 ऑक्टोबरपर्यंत वेळ आहे. त्यामुळे सरकारने वेळ वाया घालवू नये. अन्यथा 11 ऑक्टोबरपासून सरकार विरोधात आरक्षणाची मोहिम तीव्र करण्यात येईल, असा इशाराही या बैठकीत देण्यात आला आहे.

सोलापूरात आज दिवसभरात 300 कोरोना पॉझिटिव्ह, तर 9 जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या