गेवराई : गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव कॅम्प तलवाडा फाटा येथील केमिस्ट दुकानाला आग लागून स्फोट झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे. या स्फोटात डॉ. सुधाकर भाऊसाहेब चोरमले यांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर या घटनेत एक जण जखमी झाला आहे.
दरम्यान, ही घटना नेमकी काय आहे, याचे कारण स्पष्ट झाले नसले तरी याबाबत चर्चेला उधाण आले आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील जायकवाडी वसाहत, बागपिंपळगाव येथील डॉ. सुधाकर चोरमले यांचा तलवाडा फाटा येथे दवाखाना असून त्यालगत बेलगाव येथील मोरे यांचे केमिस्ट दुकान आहे. गेल्या पंधरा दिवसापासून या दवाखाना व मेडिकलच्या बाजूला डॉ. औटे यांचे मानव कल्याण सेवाभावी संस्था संचलित साई बाबा स्वास्थ केंद्र कार्यरत झालेले आहे.
रविवार 7 जून रोजी मध्यरात्री 2 च्या सुमारास या केमिस्ट दुकानाला आग लागली असून या आगीत बाजूला असलेल्या साई समर्थ दवाखान्याचे डॉ. सुधाकर भाऊसाहेब चोरमले यांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेत त्यांच्यासोबत असलेला एक जण जखमी झाला आहे. या घटनेबाबत परिसरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
Read More मृतदेहाची अदला-बदली : वडिलांवर लेकानं दोनवेळा केले अंत्यसंस्कार