औरंगाबाद : औरंगाबाद शहरात आज सकाळी तब्बल 30 जणांना तर दुपारनंतर 28 जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा हा 900 वर पोहोचला आहे.
सकाळी आढळून आलेल्या 30 जणांमध्ये एमजीएम मेडिकल कॉलेज येथील 3, हनुमान चौक, चिकलठाणा येथील 1, , राम नगर येथील 3, एमआयडीसी येथील 1, जालान नगर येथील 1, संजय नगर, लेन नं.6 येथील 3, सादात नगर येथील 4, किराडपुरा येथील 1, बजाज नगर येथील 1, जिनसी रामनासपुरा येथील 1, जुना मोंढा, भवानी नगर, गल्ली नं. पाच येथील 1, जहागीरदार कॉलनी येथील 1, आदर्श कॉलनी येथील 1, रोशन गेट येथील 1 आणि अन्य भागातील 7 कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 17 पुरुष आणि 13 महिला रुग्णांचा समावेश आहे.
Read More औरंगाबादेत कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढला
दुपारी 4 वाजता आढळून आलेल्या 28 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कैलास नगर येथील 1, चाऊस कॉलनी येथील 1, मकसूद कॉलनी येथील 2, हुसेन कॉलनी येथील 4 जाधववाडी येथील 1, न्यू बायजीपुरा, गल्ली नं.3 येथील 1, एन- 6, संभाजी कॉलनी, सिडको येथील 1, कटकट गेट येथील 1, बायजीपुरा येथील 10, अमर को- ऑपरेटिव्ह सोसायटी, एन-8 सिडको येथील 2, लेबर कॉलनी येथील 1, जटवाडा येथील 1, राहुल नगर येथील 1 आणि जलाल कॉलनी येथील 1 जण असे 16 पुरुष आणि 12 महिला रुग्णांचा समावेश आहे.
त्याशिवाय औरंगाबादमध्ये गेल्या 24 तासात दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा हा 25 वर जाऊन पोहोचला आहे. दुसरीकडे अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे औरंगाबाद शहरातील संजय नगर परिसरातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचा आकडा हा तब्बल 106 वर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे हा परिसर औरंगाबाद शहरातील अतिसंवेदनशील परिसर बनला आहे.
Read More औरंगाबाद रेल्वे अपघात : राज्यसरकारला उच्चन्यायालयाकडून निर्देश
कोरोनाचा वाढता आकडा नियंत्रणात ठेवण्यासाठी औरंगाबाद शहरात सध्या पॅरामिल्ट्री फोर्स तैनात करण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोनसह शहराच्या इतरही परिसरात हे जवान तैनात असणार आहेत. तर दुसरीकडे कंटेन्मेंट झोनमध्ये सुरू असलेली नागरिकांची वर्दळ कमी करण्यासाठी आता कंटेन्मेंट झोन परिसरात गस्ती पथक सुरू करण्यात आले आहेत. हे पथक दिवसातून दोन वेळा रेड झोन मध्ये गस्त घालणार आहे.