24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeमराठवाडामराठवाड्यात पिके पाण्याखाली

मराठवाड्यात पिके पाण्याखाली

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद/लातूर : मराठवाड्यात मागच्या चार दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. मंगळवारी पहाटेपासून मराठवाड्यातील बहुतांशी भागात दमदार पावसाने झोडपले. त्यामुळे आठही जिल्ह्यातील नदी-नाले तुडुंब भरून वाहात असून, अनेक ठिकाणी प्रकल्प तुडुंब भरले आहेत. तसेच शेतशिवारातही सखल भागात पाणी थांबले आहे. त्यामुळे खरिपाची पिके पाण्याखाली गेले आहेत, तर नदी, ओढ्या काठावरील पिके पुरात खरडून गेल्याने खरीप पिकांची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे खरिपाचे उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

मागच्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात सर्वत्र पाऊस सुरू आहे. मंगळवारी राज्यात पावसाचा अधिक जोर होता. मराठवाड्यातही सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सर्व नद्या, नाल्यांना पूर आला. त्यामुळे नदीकाठावरील पिके आणि शेतजमिनीतील मातीही खरडून गेली. त्यामुळे शेतीचे तर नुकसान झाले. तसेच पिकांचीही हानी झाली. एवढेच नव्हे, तर अनेक भागात पावसाचे प्रमाण अधिक झाल्याने शेतजमिनीत पाणी थांबले आहे. त्यामुळे पिके पिवळी पडू लागली असून, याचा पीकवाढीवर आणि उत्पादनावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. मराठवाड्यात अजूनही नदी, नाले, ओढ्यांना पूर असून, अ्ननेक ठिकाणी प्रकल्प तुडुंब भरल्याने प्रकल्पांचे दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे नद्यांची पाणी पातळी वाढली आहे.

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात शिवूर येथे गोदावरीची पाणी पातळी वाढली आहे. तसेच जिल्ह्यात भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला, तर हिंगोली जिल्ह्यात पुरात जनावरे वाहून गेली. याशिवाय अनेकजण पुरात वाहून गेल्याने अनेकांचा बळी गेला आहे. लातूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला असून, पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. नांदेड, परभणी, उस्मानाबाद, बीड, जालन्यातही पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.
येलदरीचे दरवाजे उघडले

जिंतूर : जिंतूर तालुक्यातील येलदरी धरण बुधवार, दिÞ. ८ रोजी १०० टक्के भरले असून धरणाचे सर्व दरवाजे उघडून नदीपात्रात १९५९७.९७ क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदी पात्रात पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा येलदरी धरण, पूर नियंत्रण कक्षाकडून देण्यात आला. येलदरी धरणाच्या वरच्या भागात असलेल्या खडकपूर्णा धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने तसेच खडकपूर्णा धरणातून पाण्याचा विसर्ग चालू असल्याने येलदरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे येलदरीचे सर्व दरवाजे उघडण्यात आले. सुरुवातीला ४ दरवाज्यांतून, तर त्यानंतर ९ दरवाजे उघडण्यात आले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या