27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeमराठवाडामराठवाड्यात कोरोना संसर्गात घट

मराठवाड्यात कोरोना संसर्गात घट

एकमत ऑनलाईन

मराठवाड्यात सलग सातव्या दिवशी रुग्णसंख्या हजारापेक्षा कमी आहे. कोरोना संशयितांच्या चाचण्यांचे प्रमाण कायम असून, रुग्णसंख्या आटोक्यात असल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात आठवड्यापासून रुग्णसंख्या लक्षणीय घटली असून, दररोज दोन हजाराच्या जवळपास असणारी रुग्णसंख्या सलग सातव्या दिवशी एक हजाराच्या आत आहे.

रविवार दि़ ११ ऑक्टोबर रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जालना जिल्ह्यात सर्वाधिक २६६ रुग्ण आहेत. औरंगाबाद १८२, नांदेड १२०, उस्मानाबाद १०९, लातूर ९३, बीड ९०, परभणी ६५ आणि हिंगोली ११ अशी नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे़ आतापर्यंत रुग्णसंख्या एक लाख १४ हजार ८०६ वर पोहचली आहे. त्यापैकी ९७ हजार ६५ रुग्ण प्रकृती सुधारल्यानंतर घरी परतले आहेत. १४ हजार ४७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नांदेडात १२० नवे पॉझिटिव्ह
जिल्ह्यात २०५ कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर १२० व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात एकुण २ हजार ४६१ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून, त्यातील ४८ बाधितांची प्रकृती अती गंभीर स्वरुपाची आहे. अहवालात ४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

औरंगाबादेत १८२ नवे बाधित
जिल्ह्यात १८२ कोरोनाबाधितांची भर पडली. पाच जणांचा मृत्यू झाला, तर ३३२ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ३० हजार ९१६ जण करोनामुक्त होऊन परतले आहेत. एकूण करोनाबाधित रुग्णांचा आकडा ३५ हजार २१२ झाला आहे. आजवर ९९५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३३०२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

उस्मानाबादेत १०९ नवे बाधित
जिल्ह्यात १०९ कोरोना संसर्गीत रुग्ण असल्याची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.

परभणीत ६५ नवे रुग्ण
जिल्हयात आज ६५ नव्या रुग्णांची भर पडली असून, सध्या रुग्णालयात एकूण ६१८ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती माहीती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.

मांजरा खोऱ्यातील कोरड्या प्रकल्पांचा अभ्यास करावा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या