29.6 C
Latur
Friday, January 22, 2021
Home मराठवाडा होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न - मंत्री अमित देशमुख

होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न – मंत्री अमित देशमुख

एकमत ऑनलाईन

सोनाजीराव होमिओपॅथीक वैद्यकीय कॉलेज तर्फे ‘केशरबाई सोनाजी क्षीरसागर’ उर्फ ‘केशरबाई काकू’ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारला वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना कै. केशरबाई काकूंचे अथक परिश्रम व त्यांनी समाजाप्रती केलेल्या प्रचंड कार्याला उजाळा देताना देशमुख म्हणाले, ‘केशरबाई काकूंनी बीड येथे सोनाजीराव होमिओपॅथीक वैद्यकीय कॉलेजची स्थापना केली. आजवर या होमिओपॅथिक कॉलेजमधून अनेक नामवंत होमिओपॅथी डॉक्टरांनी शिक्षण प्राप्त केले व लौकिक मिळवला आहे.

कोविड -19 महामारीच्या काळात जगभर सर्व उपचार पद्धती कोरोना रुग्णांवर शक्य ते सर्व उत्तम उपचार करत आहेत. त्यात होमिओपॅथीदेखील अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. महात्मा गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे होमिओपॅथी ही अहिंसक व सर्वांना परवडेल अशी उपचार पद्धती आहे.’ असेही देशमुख यांनी म्हटले.

एकीकडे हिंदुस्थानातील एकूण होमिओपॅथी वैद्यकीय कॉलेजपैकी एक चतुर्थांश कॉलेज ही एकट्या महाराष्ट्रात असून राज्यात अजून एकही शासन संचालित होमिओपॅथिक वैद्यकीय कॉलेज नाही यावर त्यांनी सखेद आश्चर्य व्यक्त करून उपस्थितांना खात्री दिली की त्यांच्या येत्या कार्यकाळात राज्य शासनाद्वारे होमिओपॅथी मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील व गरज पडेल तिथे केंद्र सरकारची मदतदेखील घेतली जाईल असेही देशमुख म्हणाले.

कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,415FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या