34.3 C
Latur
Friday, May 20, 2022
Homeमराठवाडाबीडमधील तरुणाची सुसाईड नोट बनावट

बीडमधील तरुणाची सुसाईड नोट बनावट

एकमत ऑनलाईन

बीड : विवेकच्या मृत्यूचा फायदा घेत त्याच्या नावे बनावट सुसाईड नोट तयार केली. ती सुसाईड नोट सोशल मीडियाद्वारे व्हायरल करत सार्वजनिक शांततेचा भंग करण्याच्या उद्देशाने केलेल्या या कृत्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुसाईड नोटमधील हस्ताक्षर तीन नमुन्यांतून तपासण्यात आले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने बीड जिल्ह्यातील केतुरा गावातील विवेक रहाडे या १८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली असल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी समोर आले होते. तसेच आत्महत्या करण्यापूर्वी त्याने चिठ्ठीतही तसा उल्लेख केल्याचे म्हटले होते. मात्र, सोशल मीडियावरून व्हायरल होणारी ती सुसाईड नोट बनावट असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

विवेक रहाडे या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर मराठा आरक्षणामुळे त्याने गळफास घेतल्याचे वृत्त पसरले होते. मात्र, त्यानंतर सुसाइड नोट आणि त्या मुलाचे हस्ताक्षर तपासून पाहण्यात आले.

सुशांतची आत्महत्याच

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या