25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeमराठवाडापरांड्यात माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील सक्रीय!

परांड्यात माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील सक्रीय!

एकमत ऑनलाईन

तानाजी सावंतांना तोडीस तोड उत्तर देणारा नेता तयारीला लागला
मुंबई : बाळासाहेबांनी वडापची गाडी चालवणा-या एका ड्रायव्हरला थेट आमदार केले. हा नेता पुढे निवडून येत राहिला, पण या नेत्याच्या मतदारसंघात एंट्री झाली ती तानाजी सावंत यांची.. पक्षाचा आदेश मानून तानाजी सावंत यांच्यासाठी या नेत्याने काम केले आणि मतदारसंघात भगवा फडकवला.. एकेकाळी वडापसाठी कमांडर जीप चालवणा-या या नेत्याचे नाव आहे ज्ञानेश्वर पाटील..

परंडा- बार्शी कमांडर गाडीत प्रवासी वाहतूक करणारे ज्ञानेश्वर तात्या पाटील आमदार झाले आणि शिवसेनेत मानाचे स्थानही मिळवले. आता पक्ष अडचणीत सापडला असताना स्वत:च्या मतदारसंघात शिवसेनेला बळ देण्यासाठी हेच ज्ञानेश्वर पाटील सक्रिय झाले आहेत आणि मातोश्रीहून आदेशाची वाट पाहत आहेत. भूम परंड्यात ठाकरेंना ज्ञानेश्वर पाटलांच्या निमित्ताने तानाजी सावंतांविरोधात तोडीस तोड देणारा नेता आता तयारीत आहे.

बाळासाहेबांच्या झंझावाती सभा आणि मराठवाड्यात आलेली शिवसेनेची लाट पाहून ज्या नेत्यांनी भगवा हाती घेतला, त्यात ज्ञानेश्वर पाटील यांचेही नाव होते. शिवसेनेत प्रवेश करून समाजसेवा करावी या उद्देशाने वडापची गाडी चालवणारे ज्ञानेश्वर पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने ज्ञानेश्वर पाटील यांना परंडा तालुका प्रमुख केले. दिलेल्या संधीचे सोने करत ज्ञानेश्वर पाटील यांनी पायाला भिंगरी बांधून दिवसरात्र मेहनत करत परंडा, भूम भागात शिवसेना वाढवली. १९९२ मध्ये झालेल्या परंडा नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेकडून ज्ञानेश्वर पाटील बिनविरोध नगरसेवक झाले.

१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार महारुद्रबप्पा मोटे यांचा ५ हजार मताच्या फरकाने पराभव केला. ज्ञानेश्वर पाटील पहिल्यांदा शिवसेनेकडून परंडा, भूम विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे तात्यासाहेब गोरे यांना ३ हजार मतांनी पराभूत करून ज्ञानेश्वर पाटील दुस-यांदा आमदार झाले. पण २००४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या राहुल मोटे यांनी ज्ञानेश्वर पाटलांचा विजय रथ थोपवला आणि पराभव केला. पुढे २००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा राहुल मोटेंनी ज्ञानेश्वर पाटलांचा पराभव केला.

सलग तीन वेळा पराभूत झाल्यानंतर भूम परांडा मतदारसंघात शिवसेनेने सोलापूर जिल्ह्यातून आलेल्या तानाजी सावंतांना संधी दिली. तानाजी सावंत विधानसभा निवडणूक लढले आणि आमदारही झाले. ज्ञानेश्वर पाटील हे सध्या उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे सदस्य आहेत. त्यांचा परंडा, भूम आणि वाशी या मतदारसंघात दांडगा संपर्क आणि चांगला कार्यकर्ता वर्ग आहे. ज्ञानेश्वर पाटील हे आता उद्धव ठाकरेंची भेटही घेणार आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ज्ञानेश्वर पाटील हे शिवसेनेचे उमेदवारही असू शकतात. कारण तानाजी सावंतांनी शिंदे गटात गेल्यानंतर ठाकरे कुटुंबावर थेट टीका केली. आदित्य ठाकरे हे एक साधे आमदार आहेत, असेही सावंत म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या