25.4 C
Latur
Monday, March 1, 2021
Home मराठवाडा हर्षवर्धन जाधव यांचा सुपुत्र राजकारणात

हर्षवर्धन जाधव यांचा सुपुत्र राजकारणात

एकमत ऑनलाईन

कन्नड : ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. याच दरम्यान हर्षवर्धन जाधव राजकारणात सक्रिय होत असून त्यांच्या पॅनलची घोषणा करण्यात आली आहे. हर्षवर्धन जाधव यांचे सुपुत्र आदित्य जाधव याने मंगळवारी कन्नड येथे पत्रकार परिषद घेऊन वडिलांच्या पॅनलची अधिकृत घोषणा केली आहे.

आदित्य जाधव याने केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या आणि त्यांची आई संजना जाधव यांच्या विरोधात हर्षवर्धन यांचे पॅनल उभे केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत रायभान जाधव यांची तिसरी पिढीही सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. हर्षवर्धन जाधव यांना अटक झाल्यानंतर आदित्यने स्वत: सर्व सूत्रे हातात घेतली आहेत. त्याने राजकीय वाटचाल सुरू केल्याने राजकारणातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अकरावीत असलेल्या आदित्यने ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रकारांनी विचारलेल्या काही खोचक प्रश्नांना नेत्याप्रमाणे समर्पक उत्तरेही दिली आहेत. अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, बंद पडलेली मका खरेदी यासारख्या अनेक समस्यांचा सामना सध्या शेतक-यांना करावा लागत आहे. हर्षवर्धन जाधव हे शेतकºयांसाठी राजकारणात सक्रिय होत असून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती निवडणुका लढवणार असल्याची घोषणा आदित्य जाधवने केली आहे. तसेच जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे देखील म्हटले आहे.

राजकीय हेतूने गुन्हा दाखल
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह एका महिलेवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर चतु:शृंगी पोलिसांनी जाधव यांना अटक केली आहे. जाधव यांनी आपल्याविरुद्ध राजकीय हेतूने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा दावा केला आहे.

किसान आंदोलनाचा हरियाणात भाजपला झटका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या