21.8 C
Latur
Sunday, November 29, 2020
Home मराठवाडा बीडमध्ये पहिल्या कोरोना विषाणू स्वॅब प्रयोगशाळेचे धनंजय मुंडेंच्या हस्ते उद्घाटन

बीडमध्ये पहिल्या कोरोना विषाणू स्वॅब प्रयोगशाळेचे धनंजय मुंडेंच्या हस्ते उद्घाटन

एकमत ऑनलाईन

बीड : बीडसह इतर जिल्ह्यातील कोरोना संशयित रुग्णांच्या विषाणूंचे नमुने तपासण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना व केंद्र सरकारच्या मार्गदर्शक निर्देशानुसार आवश्यक त्या रुग्णांच्या तात्काळ चाचणी करण्यासाठी या प्रयोगशाळेचा महत्त्वपूर्ण उपयोग होईल. यापूर्वी यासाठी औरंगाबाद, पुणे नंतर लातूर या ठिकाणी नमुने पाठवून अहवाल येण्यास 24 तास लागायचे त्या वेळेची बचत होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

अंबाजोगाई येथे कोरोना विषाणू चाचणी (covid-19) साठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सूक्ष्म जीवशास्त्र विभागाअंतर्गत विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे (व्हि.आर.डी.एल.) आज पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमास आमदार संजय दौंड, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार उपस्थित होते. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सदर कार्यक्रम साधेपणाने करण्यात आला.

Read More  WHO ला दिली माहिती : 7 दिवसांत रुग्ण बरा; भारतीय डॉक्टरनं औषध शोधल्याचा दावा

पालकमंत्री मुंडे म्हणाले कोरोना विषाणूचा संसर्ग सुरु झाल्यानंतर पुणे-मुंबई सह इतर प्रादुर्भाव झालेल्या जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात येथील मूळचे चाकरमाने परत येऊ लागले. जिल्ह्यात बाधित रुग्ण आढळून येऊ लागले. आज उद्घाटन केलेल्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील देखील कोरोना संशयित रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करता येईल व कोरोना संसर्ग साथीला नियंत्रणात ठेवण्यासाठी याची मदत होईल, असे पालकमंत्री श्री मुंडे म्हणाले. ते पुढे म्हणाले, या प्रयोगशाळेच्या कार्यान्वित होण्यासाठी भारतीय आयुर्विज्ञान संस्थाकडे पाठपुरावा करण्यात आला असून जिल्हाधिकारी, अधिष्ठाता आणि प्रशासन यांचे प्रयत्न महत्त्वाचे योगदान आहे, असे पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रयोगशाळेची केली पाहणी :यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी (व्हि.आर.डी.एल.) प्रयोगशाळेची पाहणी केली. अधिष्ठाता डॉ.देशमुख तसेच डॉ.निळेकर, डॉ.अमित लोमटे यांनी माहिती दिली. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात मागील महिन्यात भेट देऊन आढावा घेतला होता. यानंतर एमआरआय मशीन प्रश्न मार्गी लावून व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिले आहेत. आज उद्घाटन झालेल्या व्हि.आर.डी.एल. प्रयोग शाळेमुळे कोरोना विरुद्धच्या लढाईत जिल्ह्यात बळ प्राप्त झाले आहे.कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन बीड जिल्ह्यातच कोरोना स्वॅबची तपासणी केली जावी, या अनुषंगाने पालक मंत्री मुंडे यांनी केलेल्या पाठपुराव्याने राज्य शासनाच्या मान्यतेसह स्वाराती रुग्णालयात कोरोना चाचणी प्रयोगशाळेस भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) यांची चाचणी सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. सुरुवातीला दर दिवसाला येथे कोरोना विषाणू संबंधिच्या स्वॅबच्या १०० नमुन्यांची तपासणी करणे शक्य होणार असून हळूहळू ही संख्या वाढवली जाईल.

ताज्या बातम्या

आठ वाहनांच्या अपघातात २ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

पुणे /धायरी : मुंबई बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले उड्डाण पुलाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या २२ चाकी ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने ५ पाच चार चाकी,...

बीडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

बीड : आष्टी तालुक्यातील पारगाव येथे रविवारी सकाळी झालेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये ५४ वर्षीय महिला जखमी झाली होती. ही घटना ताजी असतानाच अवघ्या काही...

महाराष्ट्रात ५ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ५४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या...

लातूर जिल्ह्यात ६१ नवे बाधित

लातूर : जिल्ह्यात रोज नव्या रुग्णांची भर पडत असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढू लागली आहे. रविवार दि़ २९ नोव्हेंबर रोजी एकूण ६१ नवे रुग्ण आढळून...

उज्ज्वल भवितव्यासाठी बोराळकरांना पहिल्या पसंतीचे मत द्या

उस्मानाबाद : उज्ज्वल भवितव्यासाठी महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मत द्या, असे आवाहन भाजपा आ. राणाजगजितसिंह यांनी केले. माझा बूथ माझी जबाबदारी...

बांधकाम मजुरांना दलालांच्या धमक्या, लाभ बंद करण्याची तंबी

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, दलालाकडून जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची कशा प्रकारे लूट केली जात आहे. याची वृत्तमालिका एकमतने सुरू...

निलंगा, परिसरात अवैध धंदेवाईकांचा धुमाकूळ

निलंगा : जिल्हा पोलीस अधीक्षकांचा अवैद्य व्यवसायाविरूद्ध दबाव आहे. अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले. पोलीस अधीक्षकांच्या धडक मोहिमेमुळे अवैध धंदेवाल्यांचे...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्ग कासारशिरसीमार्गे जाणार

कासारशिरसी : लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्ग कासारशिरसी मार्गे जाणार असल्याची ग्वाही औसा विधान सभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदे दिली. आमदार म्हणाले की,...

‘आरटीई’अंतर्गत ८३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्­चित

पुणे : बालकांच्या मोफत व सक्­तीच्या शिक्षण हक्­क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील शाळांमध्ये ८३ हजार १२४ बालकांचे प्रवेश निश्­चित झाले आहेत. तर, अद्यापही ३२ हजार...

दिल्लीतील सरकारी कर्मचा-यांसाठी वर्क फॉर्म होम

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने सरकारी कार्यालयांमधील कर्मचा-यांची...

आणखीन बातम्या

बीडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

बीड : आष्टी तालुक्यातील पारगाव येथे रविवारी सकाळी झालेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये ५४ वर्षीय महिला जखमी झाली होती. ही घटना ताजी असतानाच अवघ्या काही...

जालन्यात गुराख्याची गळा चिरून हत्या

जालना : जिल्ह्यातील घनसावंगी येथील सूतगिरणीजवळ असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेल्या गुराख्याची धारदार शस्त्राने गळा कापून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मारोती विश्वनाथ...

बीडमध्ये बिबट्याचा मुलावर हल्ला

बीड : शेतात गेलेल्या दहा वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार दि़ २७ नोव्हेंबर रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास आष्टी तालुक्यातील...

बांधकाम मजुरांच्या योजनांवर कामगार अधिकारी, दलालांचा डल्ला

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम मजुरांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. बांधकाम मजुरांना या...

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक; दहा उमेदवारांनी घेतले अर्ज मागे

औरंगाबाद : 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 करिता आज दि.17 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंत एकूण 45 वैध ठरलेल्या अर्जांपैकी 10...

दररोज दोन हजार भाविकांना मिळणार विठ्ठलाचे दर्शन

पंढरपूर : पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रक्मिणी मंदिर भाविकांसाठी खूले करण्यात आले आहे. भाविकांची वाढती गर्दी व मागणी लक्षात घेता मंदिर समितीच्या वतीने बुधवारपासून...

तब्बल आठ महिन्यानंतर विठूरायाची आणि भक्तांची झाली भेट

पंढरपूर (अपराजित सर्वगोड) : तब्बल आठ महिन्यानंतर दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीमातेचे दर्शन साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजेच...

श्री तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी खुले

उस्मानाबाद: गेली आठ महिने कोरोना महामारीमुळे कुलूपबंद असलेले श्री तुळजाभवानीचे मंदिर उद्या सोमवारपासून भाविकांसाठी खुले होणार आहे. पण दररोज केवळ चार हजार भविकांना मंदिरात...

प्रियकराचा प्रेयसीवर अ‍ॅसिड हल्ला, प्रेयसीचा दुर्दैवी मृत्यू

बीड : लिव्ह इनमध्ये राहात असलेल्या प्रियकराने प्रेयसीवर अ‍ॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. दरम्यान प्रेयसीला बीडच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले...

उघडले देवाचे द्वार…..!

मुंबई दि १४(प्रतिनिधी) कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात नियंत्रणात आल्याने पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली....
1,350FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...