जालना : जालना जिल्ह्यातील सहा संशयितांचे तर दुपारी एका संशयीताचा अहवाल आज बुधवारी पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून जालना तालुक्यातील जामवाडी येथील एका 60 वर्षीय व्यक्तीचा कोरोना मुळे मृत्यू झाला असल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले आहे. जालना जिल्ह्यात आतापर्यंत 9 जनांचा मृत्यु झाला असून एकूण कोरोनाबाधीतांची सख्या 316 झाली आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी अशा 11 जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचार्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. प्रयोग शाळेकडून जिल्हा रुग्णालयास प्राप्त झालेल्या अहवालानुसार सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यात जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या परिसरातील कोविड केअर सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या एका डॉक्टरचा समावेश असून जिल्हा परिषद कार्यालयात मूळ सेवेत असलेल्या मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्षात प्रतिनियुक्तीवर असलेल्या(रा.समर्थनगर )एका कर्मचार्यांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.
याच कक्षात कार्यरत असलेल्या एका कर्मचार्यासह त्यांच्या पित्याचा अहवाल दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह प्राप्त झालेला असून आज पुन्हा या कर्मचार्याच्या कुटुंबातील आणखी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे भाग्यनगर मधील रहिवाशी असलेल्या नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. राज्य राखीव दल आणि जाफराबाद येथील आदर्शनगर मधील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. जालना तालुक्यातील जामवाडी येथील एका 60 वर्षीय व्यक्तीला मृत अवस्थेत जिल्हा सरकारी रुग्णालयात त्यांच्या नातेवाईकांनी दाखल केले होते असे या सरकारी सुत्रांनी सांगितले. या मयत व्यक्तीच्या लाळेचे नमुने प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
त्यात मयत व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असून जिल्ह्यात आतापर्यंत हा नववा बळी ठरला असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील दोन कर्मचार्यांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यामुळे अधिकारी व कर्मचारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी आणि काही कर्मचारी अशा 11 जणांच्या लाळे चे नमुने घेऊन जिल्हा रुग्णालयाने सदर नमुने प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते. या सर्व अकरा जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्यामुळे जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचार्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे
Read More दिवसभरात लातूर जिल्ह्यात ३ नवीन रुग्ण