26.9 C
Latur
Sunday, January 24, 2021
Home मराठवाडा जायकवाडी धरण 60 टक्क्यांवर : नाशिक विभागात मुसळधार पाऊस

जायकवाडी धरण 60 टक्क्यांवर : नाशिक विभागात मुसळधार पाऊस

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद | नाशिक विभागात दोन दिवस झालेल्या जोरदार पाऊसामुळे पैठण येथील जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली आहे. मुसळधार पाऊसाचे पाणी सध्या जायकवाडी धरणाकडे झेपावत असून शुक्रवारी सायंकाळी जायकवाडी धरणात सरासरी 20 हजार क्युसेस प्रतितास यावेगाने पाण्याची आवक सुरू होती. दरम्यान पाण्याची आवक वाढल्याने धरणाचा पाणी साठा हा 60 टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्याचा शेती सिचंनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वर्षभरासाठी मिटणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

मागच्या वर्षी 15 आँगस्ट रोजी जायकवाडी धरणाची पाणी पातळी ही 92 टक्के होती त्यामुळे आजच्या दिवशी धरणाचे दरवाजे वर करुन गोदावरी नदीच्या पात्रात विसर्ग करण्यात आला होता. मागील वर्षाप्रमाणे याहीवर्षी जायकवाडी धरण शंभर टक्के भरेल अशी आशा शेतकरी वर्गातुन व्यक्त केली जात आहे. दरम्यान नासिक विभागातील नांदूर-मध्येमेश्वर व दारणा धरण ओहरफ्लो झाल्याने या दोन्ही धरणातुन गोदावरी नदीच्या पात्रात विसर्ग सुर केला आहे. तर नेवासा येथील देवगड आणि शिवना या दोन्ही केटीवेअर मधुन सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी पैठण जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावत आहे.

राज्यात आजपर्यंत कोरोनाच्या ३१ लाखांहून अधिक चाचण्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,416FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या