33.7 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeमराठवाडाकरुणा मुंडेंच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली

करुणा मुंडेंच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी आपल्या नवीन पक्षाची घोषणा करणा-या करुणा धनंजय मुंडे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत जाऊन बैठका घेत आहेत. दरम्यान मंगळवारी (१८ जाने) औरंगाबादमध्ये सुद्धा करुणा मुंडे यांची बैठक होणार होती. मात्र या कार्यक्रमाला औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी परवानगी नाकारली.

करुणा मुंडे या मंगळवारी औरंगाबाद येथील औरंगाबाद-बीड रोडवरील सिद्धेश्वर लॉन्स येथे होणा-या बैठकीला हजर होणार होत्या. त्यासाठी आयोजकांकडून पूर्ण तयारीसुद्धा करण्यात आली होती. मात्र औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी बैठक घेण्यास परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी कोरोनाचे कारण देत या बैठकीची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता करुणा मुंडे यांना या कार्यक्रमाला हजर राहता येणार नाही.

कार्यक्रम पुढे ढकलला…
औरंगाबाद जिल्ह्यात सध्या कोरोनाची परिस्थिती गंभीर असून त्यामुळे या कार्यक्रमाला परवानगी देता येणार नाही अशी भूमिका पोलिसांनी घेतली. त्यानंतर आयोजकांनी सुद्धा पोलिसांच्या भूमिकेला मान्य करत कार्यक्रम पुढे ढकलला असल्याचे सांगितले आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या