24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeमराठवाडाकरुणा शर्मा यांना अखेर जामीन मंजूर

करुणा शर्मा यांना अखेर जामीन मंजूर

एकमत ऑनलाईन

बीड : करुणा शर्मा यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. अंबाजोगाई आणि परळीमध्ये चार्जशीट दाखल होईपर्यंत न येण्याच्या त्यांना सूचना आहेत. २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर शर्मांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. करुणा शर्मा यांना ५ सप्टेंबरला अटक झाली होती. जवळपास १६ दिवसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली आहे. शर्मांसह त्यांचे चालक अजय मोरेंनाही जामीन मिळाला आहे.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी त्या बीड जिल्ह्यातील परळीमध्ये आल्या होत्या. त्यावेळी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या