23.2 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeमराठवाडाकरुणा शर्माचा न्यायालयीन कोठडीत वाढ

करुणा शर्माचा न्यायालयीन कोठडीत वाढ

एकमत ऑनलाईन

बीड: जातीवाचक शिवागाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा शर्मा यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र ही न्यायालयीन कोठडी आता १७ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळत न्यायालयीन कोठडी वाढवण्यÞाचा निर्णय घेतला.

या प्रकरणावरील पुढील सुनावणी आता १८ सप्टेंबर रोजी होणार आहे. यामुळे करुणा शर्मा यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्कात आता वाढला आहे. तपास अधिकारी प्रत्यक्षात हजर नसल्याने ही तारीख वाढवण्यात आली आहे.
करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांच्या वकीलांनी जमिनासाठी अंबाजोगाई कोर्टात अर्ज दाखल केला. याच जामिनाच्या अर्जावर आज अंबाजोगाई कोर्टामध्ये सुनावणी पार पडली. मात्र सुनावणी अंती करुणा शर्मा यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या