30.8 C
Latur
Monday, January 18, 2021
Home मराठवाडा बीडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

बीडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

एकमत ऑनलाईन

बीड : आष्टी तालुक्यातील पारगाव येथे रविवारी सकाळी झालेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये ५४ वर्षीय महिला जखमी झाली होती. ही घटना ताजी असतानाच अवघ्या काही तासानंतरच संध्याकाळी सहा वाजता दुसऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात ती महिला ठार झाली आहे. सुरेखा नीळकंठ भोसले (४५) असे त्या महिलेचे नाव आहे.

पारगाव (जो) येथे असलेल्या बळे वस्ती या ठिकाणी आपल्या घराच्या शेजारी शेतांमध्ये सुरेखा बळे या कापूस वेचीत होत्या. कापसाच्या पिकामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. हल्ला केलेल्या ठिकाणापासून महिलेस ओढत नेऊन तिला ठार मारले आहे. या घटनेने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनेची माहिती समजताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पथकाने शोध मोहीम सुरू केली आहे. पारगाव येथे एका दिवशी दोन घटना घडल्याने येथील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

शनिवारी मायलेकावर हल्ला करणाºया बिबट्याने रविवारी सकाळी एका वृद्धेवर हल्ला केला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.पारगाव बोराडे येथील एका वस्तीवरील शालनबाई शहाजी भोसले या शेतात भाजी आणण्यासाठी गेल्या असता, दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.

लातूर जिल्ह्यात ६१ नवे बाधित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या